Type Here to Get Search Results !

Samsung Galaxy F42 : पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप देणारा Samsung चा 'हा' स्टायलिश 5G स्मार्टफोन स्वस्तात घरी आणा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: सध्या Flipkart वर सेल सुरू असून यादरम्यान स्मार्टफोनवर चांगली सूट दिली जात आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या काही उत्तम पर्यायांची माहिती देत आहोत. सर्वोत्तम 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सवलतीत खरेदी केला जाऊ शकतो. वाचा: Samsung Galaxy F42 ऑफर: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट सेल दरम्यान Samsung Galaxy F42 ३,००० रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. अशाप्रकारे, तुम्ही फक्त २०,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत हा स्मार्टफोन घरी आणू शकता. ही त्याच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनसोबत नो कॉस्ट ईएमआय, स्टँडर्ड ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील घेता येतील. जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर, युजर्सना १५,४५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. EMI अंतर्गत, दरमहा किमान ७२८ रुपये देऊन तुम्ही हे डिव्हाइस खरेदी करू शकता. Samsung Galaxy F42 ची वैशिष्ट्ये: Samsung Galaxy F42 5G मध्ये ६.६० -इंचाचा TFT डिस्प्ले आहे. ज्याचे, रिफ्रेश रेट ९० Hz आणि आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. या स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा,५ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. Samsung Galaxy F42 5G मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, कंपास/मॅग्नेटोमीटर सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सीलरोमीटर सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि जायरोस्कोप सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth v ५.००, USB Type-C, हेडफोन जॅक ३.५ mm आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये १५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zKMW8e
https://ift.tt/3qe5KJX
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.