Type Here to Get Search Results !

Honor Magic V: एक लाखांपेक्षा अधिक किंमतीचा Honor चा धमाकेदार फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, मिळतात ५०MP चे तीन कॅमेरे

नवी दिल्ली: ने आपला पहिला Honor Magic V ला अखेर लाँच केले आहे. याचे डिझाइन जवळपास Samsung Galaxy Z Fold सारखेच आहे. फोनमध्ये दोन डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा आणि ६६ वॉट फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स मिळतात. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३ शी तुलना केल्यास ऑनरचा फोल्डेबल फोन इंटर्नल आणि एक्सटर्नल डिस्प्लेच्याबाबतीत मोठा आहे. वाचा: मध्ये इंटर्नल डिस्प्ले ७.९ इंच दिला असून, याचे रिझॉल्यूशन २२७२x१९८४ पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशियो १०:९ आहे. तर फोनचा एक्सटर्नल ओलेड डिस्प्ले ६.४५ इंच असून, याचे रिझॉल्यूशन २५६०x१०८० पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशियो २१:९ आहे. तर सॅमसंगच्या फोनमध्ये ७.६ इंच इंटर्नल आणि ६.२ इंच एक्सटर्नल डिस्प्ले मिळतो. फोल्ड केल्यावर फोनची रुंदी ७२.७ एमएम, जाडी १४.३ एमएम आणि उंची १६०.४एमएम होते. तर अनफोल्ड असल्यास डिव्हाइस १४१.१ एमएम रुंद आणि जाडी ६.७ एमएम होते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसर दिला आहे. हा क्वालकॉमचा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर आहे. यात १२ जीबी रॅम आणि २५६/५१२ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचे तिन्ही कॅमेरे ५० मेगापिक्सल आहेत. तर सेल्फीसाठी ४२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७५० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनला सध्या चीनमध्ये लाँच केले असून, याची १८ जानेवारीपासून विक्री होईल. फोनची सुरुवाती किंमत ९,९९९ युआन (जवळपास १.१६ लाख रुपये) आहे. भारतासह इतर देशांमध्ये फोनला कधी लाँच केले जाईल, याची कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zO27gP
https://ift.tt/3qeAU3W
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.