नवी दिल्लीः Apple दरवर्षी आयफोन सीरीज लाँच करते. मागील वर्षी कंपनीने आयफोन १३ सीरीज लाँच केली होती. यावर्षी कंपनी आयफोन १४ सीरीज लाँच करण्याची तयारी करीत आहे. लाँचिंगला अजून वेळ आहे. आयफोन १४ वरून अनेक अफवा समोर आल्या आहेत. परंतु, कंपनीने यासंबंधी अजून काहीही सांगितले नाही. परंतु, त्याआधीच २०२३ मध्ये येणारी आयफोन १५ सीरीजवरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. आता आयफोन १५ वरून एक नवीन खुलासा झाला आहे. एका विश्लेषकाने नुकतेच 2023 Apple iPhone सीरीज संबंधी एका खास माहितीचा खुलासा केला आहे. सीरीज मॉडलपैकी एक पेरिस्कोप कॅमेरा लेन्स असेल ज्यात झूमची सुविधा आहे. iPhone 15 Pro मध्ये असेल पेरिस्कोप कॅमेरा MacRumors च्या एका रिपोर्टनुसार, विश्लेषक जेफ पु यांनी म्हटले की, iPhone 15 Pro मध्ये एक पेरिस्कोप कॅमेरा सिस्टम असू शकतो. जो कंपनीच्या डिव्हाइस मध्ये एक मोठा टेलिफोटो सेटअप फिट करण्यात सक्षम करेल. याशिवाय, अतिरिक्त, हे यूजर्सला क्वॉलिटी न गमवता पुढे झूम करण्याची क्षमता देते. क्यूपर्टिनो आधारित दिग्गजला काही वेळेसाठी आपल्या आयफोन्सवर पेरिस्कोप लेन्सचा समावेश असल्याची अफवा आहे. याचा पहिला उल्लेख एका ज्ञात Apple विश्लेषक मिंग-ची कू ने 2020 मध्ये केला होता. iPhone 13 Pro मध्ये आहे 3x ऑप्टिकल झूम Pro मध्ये कॅमेरा टेक्नोलॉजी असेल. परंतु, आता ताज्या रिपोर्टनुसार, यासाठी एक वर्षाची वाट पाहावी लागेल. सध्या प्रीमियम ग्रेड फ्लॅगशिप iPhone 13 सीरीज प्रो मॉडलवर 3x ऑप्टिकल झूम ऑफर करते. पुढील वर्षांपर्यंत वाट पाहावी लागणार पुढच्या पिढीच्या मॉडल सोबत iPhone 10x पर्यंत ऑप्टिकल झूम देण्यात सक्षम असू शकते. जे बाजारात याचे प्रतिस्पर्धी टॉप एन्ड अँड्रॉयड फोन असतील. त्यामुळे हे अजून कन्फर्म करण्यात न आल्याने थोडी वाट पाहावी लागणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32TBFGG
https://ift.tt/3eX6Cw8

