Type Here to Get Search Results !

Mobile Number Portability: मोबाइल नंबर पोर्ट करणे झाले सोपे, अतिरिक्त खर्चापासून होणार सुटका; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. आता यूजर्सला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्ससाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहे. यातच टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ने यूजर्सला दिलासा दिला आहे. ट्रायने नंबर पोर्ट करणे अधिक सोपे केले आहे. वाचा: ट्रायद्वारे बदल करण्यात आल्याने ज्या कंपन्या प्लान्समध्ये मोफत एसएमएस बेनिफिट्स देत नाहीत, असे रिचार्ज करणाऱ्या प्रीपेड सबस्क्राइबर्सला नंबर पोर्ट करण्यासाठी एसएमएस पाठवता येणार आहे. कंपन्या यूजर्सला अनेक स्वस्त प्लान्स ऑफर करतात. या प्लान्समध्ये यूजर्सला डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. मात्र मोफत एसएमएस मिळत नाही. अशा स्थितीमध्ये यूजर्सला नंबर पोर्ट करताना मेसेज पाठवायचा असल्यास SMS बेनिफिट ऑफर करणारा रिचार्ज करावा लागत असे. यासाठी यूजर्सला पुन्हा रिचार्जसाठी पैसे खर्च करावे लागत असे. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना चपराक लगावली आहे. आता यूजर्स मोफत एसएमएस बेनिफिट नसतानाही नंबर पोर्ट करण्यासाठी मेसेज करू शकतील. दरम्यान, टॅरिफ हाइकनंतर वीआयच्या एसएमएस बेनिफिट्ससह येणाऱ्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत १७९ रुपये आहे. तर जिओच्या प्लानची किंमत १५५ आणि एअरटेलच्या प्लानची किंमत १२८ रुपये आहे. यावरून जिओने ट्रायकडे तक्रार केली होती. ट्रायने वीआयचे प्लान्स सबस्क्राइबर्सला इतर नेटवर्क्समध्ये पोर्ट करण्यापासून रोखत असल्याचे म्हटले होते. या तक्रारीनंतर मोफत एसएमएस बेनिफिट्स नसतानाही यूजर्सला १९०० वर नंबर पोर्ट करण्याचा मेसेज करता येईल. नंबर पोर्ट करण्यासाठी 'PORT' टाइम करून स्पेसनंतर १० आकडी मोबाइल नंबर टाकावा लागेल. यानंतर ज्या ऑपरेटरची सर्व्हिसस घ्यायची आहे, त्याची निवड करावी लागेल. त्यानंतर ऑपरेटरच्या रिटेल स्टोरवर जाऊन फॉर्मसह इतर कागदपत्र द्यावी लागतील. पेमेंट व केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नंबर पोर्ट होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lKqUg8
https://ift.tt/3y7cCez
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.