Type Here to Get Search Results !

JioPhone Next: फक्त १,९९९ रुपयात JioPhone Next खरेदीचा विचार आहे? त्याआधी 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या

नवी दिल्ली : जिओने गेल्या महिन्यात ला भारतीय बाजारात सादर केले आहे. अपेक्षेप्रमाणे या फोनची किंमत कमी आहे. ईएमआयवर देखील खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. मात्र, ईएमआयवर फोनला खरेदी करताना डिव्हाइससाठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. वाचा: डिस्प्ले JioPhone Next च्या डिस्प्लेबद्दल सांगायचे तर यामध्ये ५.४५ इंच एचडी+ टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास – ३ प्रोटेक्शन मिळते. स्मार्टफोनची टच स्क्रीन आउटडोर प्रकाशात देखील व्यवस्थित दिसते. कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यात अनेक वेगवेगळे मोड्स दिले आहेत. यात नाइट मोड, पोट्रेट मोड आणि एचडीआर मोडचा समावेश आहे. कॅमेऱ्यासोबत स्नॅपचॅटचा डायरेक्ट अ‍ॅक्सेस मिळतो. फोनमध्ये क्वाडकोर क्यूएम२१५ चिपसेट आणि प्रगती ओएसचा सपोर्ट दिला आहे. यात २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि ५१२ जीबीपर्यंत एसडी कार्डचा सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये जास्त गेम्स डाउनलोड कराल अथवा व्हिडिओ पाहत असाल तर फोन हँग होऊ शकतो. किंमत जिओफोन नेक्स्टची किंमत ६,४९९ रुपये आहे. मात्र, ग्राहक १,९९९ रुपयांच्या डाउनपेमेंटवर फोनला खरेदी करू शकतात. त्यानंतर १८ अथवा २४ महिने ५०० रुपयांपेक्षा कमी ईएमआय द्यावी लागेल. ईएमआयवर हा फोन अधिक महाग पडू शकतो. मात्र, खास गोष्ट म्हणजे महिन्याच्या ईएमआयसोबत रिचार्ज प्लान्स मोफत मिळतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31sqV1h
https://ift.tt/3xSOPPg
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.