Type Here to Get Search Results !

Infinix Note: Infinix Note 11S आणि Infinix Note 11 स्मार्टफोन १३ डिसेंबरला होणार भारतात लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Infinix च्या नवीन स्मार्टफोन सीरीज च्या लाँचची घोषणा भारतात करण्यात आली असून या सीरिज अंतर्गत, आणि Infinix Note 11 स्मार्टफोन भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात १३ डिसेंबर रोजी लाँच केले जातील. या दोन्ही आगामी डिव्हाइसेसची मायक्रोसाइट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, युजर्स आगामी दोन्ही स्मार्टफोनमध्ये उच्च-रिफ्रेश रेट स्क्रीनपासून मजबूत चिपसेट आणि बॅटरी मिळवू शकतात. वाचा: Infinix Hot 11S चे संभाव्य डिटेल्स: लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, Infinix Hot 11S स्मार्टफोन ६.८२ -इंचाच्या डिस्प्लेसह येईल. या फोनमध्ये MediaTek G88 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यासोबतच, ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० mAh बॅटरी आगामी फोनमध्ये मिळू शकते, जी १८ W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज असेल. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. Infinix Note 11 मध्ये काय खास असेल? Infinix Note 11 स्मार्टफोनमध्ये १०८०x २४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ इंच स्क्रीन असेल. या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी Helio G88 चिपसेटसह ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असेल. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ किंवा १२८ जीबी स्टोरेज सपोर्ट असेल, जे एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा मुख्य लेन्स ५० मेगापिक्सेल असेल. यात २ मेगापिक्सेलचा बोकेह सेन्सर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित लेन्स देण्यात येणार आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६-मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध असण्याची शक्यता आहे Infinix Note 11 सीरीजची किंमत काय असू शकते? Infinix Note 11 सीरीजच्या किंमती किंवा फीचर्सबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण सांगण्यात येत आहे की, या सीरीजच्या दोन्ही आगामी स्मार्टफोन्सची किंमत लोकांचे बजेट लक्षात घेऊन ठेवली जाऊ शकते. त्याच वेळी, दोन्ही फोन अनेक आकर्षक रंगांमध्ये सादर केले जाऊ शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oM39Gw
https://ift.tt/3DHH5AR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.