Type Here to Get Search Results !

Flipkart Sale: १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता Realme चा ‘हा’ स्मार्टफोन, मिळतो ५० मेगापिक्सल कॅमेरा

नवी दिल्ली : तुम्ही जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑनलाइन शॉपिंग साइट वर सेल सुरू आहे. या सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्स खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही C25Y स्मार्टफोनला १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. वाचा: Realme C25Y स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवर १५ टक्के डिस्काउंटनंतर १०,९९९ रुपयात उपलब्ध आहे. सेलमध्ये एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळत आहे. या फोनवर १०,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. ही ऑफर जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास १०,९९९ रुपये किंमतीचा हा फोन फक्त ७४९ रुपयात उपलब्ध होईल. बँक ऑफरचा मिळेल फायदा फोन खरेदी करताना कोणत्याही बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. सोबतच, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सस बँक क्रेडिट कार्डचा उपयोग केल्यास ४७५ रुपयांचा कॅशबॅक मिळतो. अशाप्रकारे १०,९९९ रुपयांचा फोन ९,०२४ रुपयात खरेदी करू शकता. Realme C25Y चे फीचर्स रियलमीचा हा ४जी स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यूनिसॉक टी६१० ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी+ एलसीडी इन-सेल डिस्प्ले दिला आहे. यात एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सल मुख्य सेंसर, २ मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर सुरू असलेला फेस्टिव्ह सेल १३ डिसेंबरपर्यंत चालेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lRBstW
https://ift.tt/3mdAl8b
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.