Type Here to Get Search Results !

WhatsApp ने Delete for Everyone फीचरमध्ये केला 'हा' बदल, युजर्सना काय फायदा? पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि चॅटिंग अॅप्सपैकी एक, ने गेल्या काही वर्षांत आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट्स जारी केली असून त्यामध्ये अॅपमध्ये बरेच बदल देखील झाले आहेत. यापैकी एक म्हणजे व्हॉट्सअॅपचे Delete for Everyone फीचर आहे. उपलब्ध माहितीनुसार या फीचरमध्ये आता मोठा बदल होणार आहे. पाहा डिटेल्स. वाचा: WhatsApp च्या या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवलेले मेसेज डिलीट करू शकता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, जेव्हा व्हॉट्सअॅपने हे फीचर जारी केले होते, तेव्हा मेसेज पाठवल्यानंतर फक्त आठ मिनिटांच्या आतच तो मेसेज डिलीट करता यायचा. त्यानंतर ही वेळ वाढवून एक तास करण्यात आली. Delete for everyone फीचरमध्ये बदल : WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp आपल्या Delete for Everyone फीचरमध्ये नवीन update आणणार आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये या बदलाची चाचणी केली जात असून आता या फीचरमधील मेसेज डिलीट करण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा नसेल. इतरांना मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही तुमचा मेसेज कधीही डिलीट करु शकाल. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपच्या २.२१.२१.१ मध्ये तीन महिने जुन्या मेसेजसाठी देखील Delete for Everyone चा पर्याय देण्यात आला आहे. कधी रिलीज होणार हे फीचर : व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये सध्या या फीचरची चाचणी केली जात आहे, त्यामुळे युजर्सना हे फीचर कधी मिळेल हे आत्ताच सांगता येणार नाही. अनेकदा, बीटा व्हर्जनमध्ये चाचणी करण्यात आलेले फीचर्स युजर्सपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे याबद्दल सध्या तरी काहीच सांगता येणार नाही. व्हॉट्सअॅपने गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन फीचर्स जारी केले असून ज्यामध्ये डिसपिअरिंग मेसेजेस, व्हॉट्सअॅप पेमेंट्स यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CJahro
https://ift.tt/3k1DTsT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.