Type Here to Get Search Results !

Vodafone Idea च्या या प्लानने Jio-Airtel ला मागे टाकले, ७० दिवसांपर्यंत रोज मिळणार १.५जीबी डेटा

नवी दिल्लीः Vodafone-Idea यूजर्सला आकर्षित करण्यासाठी अनेक प्लान्स आणि ऑफर्स आणले आहेत. जिओ आणि एअरटेल कमी किंमतीत जास्त डेटा देत आहेत. तर वोडाफोन आयडिया सुद्धा या स्पर्धेत उतरले आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी वोडाफोन आयडियाच्या अशा प्लान संबंधी माहिती सांगणार आहोत, ज्यात जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत वोडाफोन आयडियाचा प्लान जबरदस्त आहे. कमी किंमतीतील प्लानमध्ये युजर्संना ७० दिवसांची वैधता दिली जात आहे. जाणून घ्या या प्लानसंबंधी. Vodafone-Idea चा ४९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ४९९ रुपयाच्या प्लानमध्ये युजर्संना ७० दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS मिळतात. याशिवाय, बिंज ऑल नाइट आणि विकेंड रोलओवर डेटा सारखे फायदे मिळतात. या प्लान सोबत Vi Movies आणि TV चे अॅक्सेस मिळते. जिओचा ४४४ रुपयाचा प्लान जिओचा ४४४ रुपयाच्या प्लानमध्ये ५६ दिवसाची वैधता मिळते. व्हीआयच्या ४९९ रुपयाच्या प्लानच्या तुलनेत कमी आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS मिळतात. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. Airtel चा ४४९ रुपयाचा प्लान एअरटेल चा ४९९ रुपयाच्या प्लानमध्ये ५६ दिवसाची वैधता मिळते. ज्यात युजर्संना रोज २ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. प्लान सोबत १ महिन्यासाठी अमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iUV6Up
https://ift.tt/3axminz
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.