Type Here to Get Search Results !

Vivo ने गुपचूपपणे लाँच केला सर्वात स्लीम आणि मोठ्या स्क्रीनचा स्मार्टफोन

नवी दिल्ली: चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने गुपचूप हा नवीन हँडसेट भारतात लाँच केला आहे. हे डिव्हाइस गेल्या वर्षीच्या Vivo Y20 चे ट्वीक्ड व्हर्जन आहे. जुन्या आणि नवीन मॉडेलमधील फक्त चिपसेटचा फरक आहे. फोनची किंमत कमी आहे. पण,एक मोठी स्क्रीन आणि ५,००० mAH ची मोठी बॅटरी या फोनमध्ये आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Vivo Y20T : वैशिष्ट्ये Vivo Y20T 2020 मध्ये रिलीज झालेल्या Vivo Y20 सारखे आहे. दोघांमधील फरक एवढाच आहे की नवीन डिव्हाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी द्वारे समर्थित आहे जे ६ जीबी रॅम (+१ जीबी विस्तारित रॅम) आणि ६४ जीबी स्टोरेजसह जोडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये प्लॅस्टिक बिल्ड आणि ६.५ इंचाचे एलसीडी पॅनल आहे जे १६०० x ७२० पिक्सल (HD+) रिझोल्यूशन आणि ड्यूड्रॉप नॉच आहे. त्याचे माप १६४.४१ x ७६.३२ x ८.४१ मिमी, वजनाचे १९२ g आणि दोन रंगांमध्ये (ऑब्सीडियन ब्लॅक, प्युरिस्ट ब्लू) येते. Vivo Y20T चा कॅमेरा: यात १३ एमपी प्रायमरी सेंसर, २ एमपी मॅक्रो स्नॅपर आणि २ एमपी डेप्थ सेन्सरसह फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी, हे डिव्हाइस ८ एमपी शूटर वापरते. Vivo Y20T बॅटरी : हे ड्युअल-सिम, 4G, ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, GNSS (GPS, Beidou, GLONASS, Galileo), ३.५ mm हेडफोन जॅक आणि microUSB पोर्टला सपोर्ट करते. हँडसेटच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, कंपास, प्रॉक्सिमिटी सेन्सर, गायरोस्कोप, ५,००० एमएएच बॅटरी, १८ डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि अँड्रॉइड ११ वर आधारित फनटच ओएस ११.१ यांचा समावेश आहे. Vivo Y20T ची भारतातील किंमत : भारतात Vivo Y20T ची किंमत १५,४९० रुपये असून स्मार्टफोन आधीच विवो इंडिया ई-स्टोअर, Amazon इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम आणि प्रमुख ऑफलाइन रिटेलर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aqqBky
https://ift.tt/3BBbOiG
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.