Type Here to Get Search Results !

ऑर्डर केला ७० हजाराचा iPhone 12, ग्राहकाला बॉक्समध्ये मिळाले विम बार साबण आणि ५ रुपयाचे नाणे

नवी दिल्लीः ई-कॉमर्स साइटवरून महागडा आयफोन ऑर्डर करण्याची तयारी करीत असाल तर एकदा ही बातमी वाचा. कारण, आयफोन १२ च्या बदल्यात एका ग्राहकाला एक साबण आणि एक ५ रुपयाचे नाणे बॉक्समध्ये मिळाले आहे. अलुवाचे मूळ रहिवासी नूरूल अमीन यांनी मोठ्या उत्साहाने अॅमेझॉनवर आयफोन १२ ऑर्डर केला होता. एका आठवड्यानंतर पार्सल त्यांच्याकडे पोहोचले. पार्सल पोहोचल्यानंतर त्यांना आनंद झाला. परंतु, पार्सल उघडताच त्यांना जोरदार धक्का बसला. कारण, ७० हजार ९०० रुपयाच्या फोन ऐवजी पॅकेट मध्ये विम बार साबण आणि ५ रुपयाचे नाणे निघाले. त्यानंतर पोलिसाच्या मदतीने एनआरआयला अखेर मोबाइलचे पैसे परत मिळाले आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, केरळ येथे सध्या वास्तव्य करीत असलेल्या एनआरआय नुरूल अमीनने अमेझॉनवरुन १२ ऑक्टोबरला फोनची ऑर्डर केली होती. आपल्या अमेझॉन पे कार्डवरून पेमेंट केले होते. १५ ऑक्टोबरला पार्सल पोहोचले. डिलीव्हरी बॉयच्या समोर एक 'अनबॉक्सिंग' व्हिडियो बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पॅकेट मध्ये फक्त एक विम डिशवॉश बार आणि ५ रुपयाचे नाणे निघाले. सायबर पोलिस स्टेशनकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली. तपास सुरू केल्यानंतर उघड झाले की, जो फोन बुक केला होता. तो यावर्षी सप्टेंबर पासून झारखंड मध्ये कोणाकडून तरी वापरला जात होता. पोलिसांनी कव्हरवर मिळालेल्या आयएमआय नंबरच्या तपासावरून हा खुलासा झाला. आम्ही अमेझॉन अधिकारी आणि तेलंगाना स्थित विक्रेत्याशी संपर्क केला. झारखंड मध्ये २५ सप्टेंबर पासून फोनचा वापर होत होता. ऑर्डर ऑक्टोबर मध्ये दिली होता. फोनचा स्टॉक नव्हता, असे विक्रेत्यांनी सांगितले. नुरूलचे पैसे परत दिले जातील, असे विक्रेत्याने सांगितले. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E5fvOE
https://ift.tt/3CcmtRl
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.