Type Here to Get Search Results !

स्टोरेज फुल झाल्याने स्लो झालाय फोन? या सोप्या ट्रिक्सने दूर होईल समस्या

नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी लक्षात घेता बाजारात जास्त स्टोरेजसह येणारे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र, कितीही असले तरीही हेवी गेम्स आणि फाइल्स डाउनलोड केल्यानंतर स्टोरेज फुल झाल्याचे नॉटिफिकेशन येतेच. अँड्राइडमध्ये कस्टमाइजेशनचे अनेक पर्याय मिळतात, मात्र स्टोरेज त्वरित फुल होते. तुम्ही काही सोप्या ट्रिक्सद्वारे फोनमधील स्टोरेज कमी करू शकता. स्मार्टफोनधील फाइल्स अथवा अप्स डिलीट करायचे नसतील तर तुम्ही सोप्या ट्रिकने अतिरिक्त मेमरी कमी करू शकता. स्टोरेज कमी करण्यासाठी वापरा ही ट्रिक
  • सर्वात प्रथम स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
  • स्टोरेज पर्याय निवडा.
  • आता फाइल कॅटगरीमधील लिस्टमध्ये जा व किती स्पेस आहे ते पाहा.
  • 'फ्री अप स्पेस' पर्याय निवडा.
  • येथे तुम्हाला अथवा Remove Items पर्याय निवडा लागेल.
  • यामुळे फोटो अथवा व्हिडिओ हटवण्याचा पर्याय मिळतो, जे बॅकअपसाठी घेतले आहेत.
  • तुम्ही उपयोगी नसलेल्या फाइल्स अथवा अप्सला देखील डिलीट करू शकता.
Cache Memory करा साफ फोनचे स्टोरेज Cache Memory मध्ये जाते, त्यामुळे ते क्लिअर करायला हवे. यासाठी सेटिंग्समध्ये जा व तेथे cache हा पर्याय दिसेल. हे क्लिअर करा. यामुळे तुमच्या फाइल्स डिलीट होणार नाहीत. तसेच, स्मार्ट स्टोरेज टॉगलच्या माध्यमातून देखील स्टोरेज कमी करू शकता. यामुळे ३०, ६० आणि ९० दिवसांनंतर आपोआप बॅकअप झालेले फोटो डिलीट होतात. उपयोगी नसलेले अॅप्स फोनमध्ये असल्यास देखील स्टोरेज फुल होते. स्मार्टफोनमधून उपयोगी नसलेल्या अॅप्सला असे करा डिलीट.
  • यासाठी Play Store उघडा. आता
  • 'माय अॅप्स अँड गेम्स' वर जा.
  • टॉप मेन्यू लाइनवरील इंस्टॉलवर टॅप करा.
  • येथे डाव्या बाजूला On this Device दिसेल, येथे तुम्हाला लिस्टला फिल्टर करण्याचा पर्याय मिळतो.
  • आता ‘Last Used’ पर्याय निवडा.
  • तुम्ही ज्या अप्सचा सर्वाधिक वापर केला ते वरती दिसतील व खालील अॅप्सला तुम्ही डिलीट देखील करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30JFIUs
https://ift.tt/3GexSCE
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.