नवी दिल्लीः स्मार्टफोन्स ज्यावेळी येत होते. त्यावेळी ते बोटावर मोजण्या इतपत होते. स्मार्टफोन सोबत आता स्मार्टफोन निर्माता कंपन्या सुद्धा वाढल्या आहेत. प्रत्येक कंपनीचे ग्राहक वेगवेगळे आहेत. त्यातील एक कंपनी म्हणजे विवो कंपनी आहे. विवोने नुकताच लॉन्च केला आहे. या फोनला अनेकांकडून पसंती मिळाली आहे. जाणून घ्या या फोनविषयी. धमाकेदार डिस्प्ले Vivo Y53s एक 4G स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा आयपीस एलसीडी डिस्प्ले सोबत येतो. या फोनमध्ये 1080 x 2408 पिक्सेलचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन, २०.९ चा आस्पेक्ट रेशियो आणि ८४ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो दिला आहे. जबरदस्त कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा मेन लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा दिला आहे. मेमरी आणि बॅटरी माली G52 MC2 GPU सोबत मीडियाटेक हेलियो G80 CPU वर चालणाऱ्या विवोचा हा स्मार्टफोन 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज सोबत येतो. युजर मायक्रो एसडी कार्डचा वापर करून स्टोरेजला ५१२ जीबी पर्यंत वाढवू शकतो. हा फोन 5,000 mAh च्या बॅटरी सोबत आणि 33W वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत मिळेल. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट दिले आहे. सुरक्षासाठी या फोनमध्ये साइड मध्ये एक फिंगरप्रिंट स्कॅनर सोबत फेस अनलॉकची सुविधा दिली आहे. फोनमध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक आणि फोन अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. फोनची किंमत हा फोन भारतात आधीच लाँच करण्यात आला आहे. आता या फोनला नायजेरियात लाँच करण्यात आले आहे. भारता या फोनला १९ हजार ४९० रुपयात लाँच करण्यात आले होते. नाजयेरियात या फोनला १५ हजार २१९ रुपयात लाँच करण्यात आले आहे. या फोनला ब्लॅक ग्रीन, ब्लू पर्पल अशा दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C6pUZx
https://ift.tt/2VDPllC

