Type Here to Get Search Results !

खिश्यातच झाला OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनचा स्फोट, वाचा कंपनी काय म्हणाली?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात स्मार्टफोनचा स्फोट असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता सोशल मीडियावर एका यूजरने स्मार्टफोनचा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. यूजरने सांगितले की, काम करताना अचानक खिश्यात काहीतरी गरम जाणवले. पाहिल्यावर फोनमधून धूर निघत होता. यानंतर यूजरने आपला कोट काढून फेकला. वनप्लसने स्फोटामागचे कारण जाणून घेण्यासाठी यूजरचा फोन मागितला आहे. मात्र, यूजरने फोन देण्यास नकार दिला. वाचा: गौरव गुलाटी या यूजरने ट्विटरवर माहिती दिली की, ‘ऑफिसमध्ये काम करत असताना ही घटना घडली.’ गुलाटीने लिहिले की, ‘मला भाजले आहे व स्फोटाच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रात्र होत आहे. मला धक्का बसला असून, सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. फोनच्या स्फोटाबाबत लवकरच मीडिया चॅनेल्सला माहिती देणार आहे. तुमच्याकडे देखील हा फोन असेल तर सर्वांनी सुरक्षित राहा.’ यूजरने दावा केला आहे की, कथित घटनेमुळे ऐकण्याच्या व पाहण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, वनप्लसनुसार, कंपनी अशाप्रकारचा प्रत्येक दावा गंभीरतेने घेत असते. वनप्लसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने ट्विटरवर नॉर्ड २ च्या कथित स्फोटोबाबत माहिती दिली व याबाबत सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने त्यांच्याशी संपर्क केला. मात्र, अनेक प्रयत्नांनंतर, भेट दिल्यानंतर देखील यूजरने टेस्टसाठी फोन दिला नाही. त्यामुळे स्फोटाचे कारण माहिती पडल्याशिवाय भरपाई देता येणार नाही.’ दरम्यान, गेल्या महिन्यात देखील एका यूजरने ट्विटरवर Nord 2 चा स्फोट झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर फोटो अपलोड न करता पोस्ट डिलीट केली होती. कंपनीने हा दावा फेटाळत म्हटले आहे की, तपासात आढळले की हा दावा खोटा होता व यामध्ये वनप्लसच्या कोणत्याच प्रोडक्टचा समावेश नव्हता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A4Ru8S
https://ift.tt/3hoX4eL
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.