Type Here to Get Search Results !

जबरदस्त! पॉप-अप कॅमेऱ्यासह लाँच झाला TCL चा ८५ इंच टीव्ही, किंमत ७ लाखांपेक्षा अधिक

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात स्मार्ट टीव्हीची मागणी प्रचंड वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ने आपला नवीन लाँच केला आहे. हा टीव्ही बिल्ट-इन गुगल टीव्हीसह येतो. विषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: TCL X9 mini-LED TV चा डिस्प्ले हा स्मार्ट टीव्ही ८५ इंच अल्ट्रा-थिन मिनी-एलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. बिल्ट-इन गुगल टीव्हीसह ८के रिझॉल्यूशनमध्ये आनंद घेता येईल. सोबतच, टीव्ही मिनी-एलईडी बॅकलाइटचा वापर करतो. कलर आउटपूट अधिक शानदार करण्यासाठी कंपनीने यात ओलेड तंत्रज्ञान दिले आहे. यामध्ये दोन एचडीएमआय २.१ पोर्ट्स आणि eARC सपोर्ट मिळेल. टीसीएलचा हा स्मार्टफोन अनेक रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. साउंड आणि कॅमेरा TCL X9 mini-LED TV ऑन्क्यो-ट्यून्ड ड्राइव्हर्ससह एक ५.१.२ साउंडबारसह येतो. हे साउंडबार टीव्ही स्टँडमध्येच देण्यात आले आहे. यात एक सबवूफर देखील आहे. याशिवाय टीव्हीवरून गुगल ड्यूओद्वारे व्हीडिओ कॉल करण्यासाठी एक पॉप-अप कॅमेरा देखील मिळेल. TCL च्या स्मार्ट टीव्हीचे डिझाइन या टीव्हीचे पॅनेल एका अल्ट्रा-थिन फ्रेमवर माउंट करण्यात आले आहे व ही फ्रेम OD-Zero तंत्रज्ञानासोबत येते. जी मिनी-एलईडी बॅकलाइट आणि एलसीडी डिस्प्ले लेअरमधील अंतर कमी करते. कंपनीनुसार, OD-Zero तंत्रज्ञान टीसीएलच्या मिनी-एलईडी टेक डिस्प्ले इंजिनिअरिंगमुळे टीव्हीची जाडी कमी आहे. सुरक्षेसाठी स्मार्ट टीव्हीच्या चारही बाजूला खूपच पातळ बेझल्स देण्यात आले आहेत. TCL X9 mini-LED TV ची किंमत TCL X9 mini-LED TV ला ९,९९९ डॉलर्समध्ये (जवळपास ७,३७,८५१ रुपये) खरेदी करू शकता. टीव्हीला सध्या फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. भारत व इतर देशात टीव्ही लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hcuLQI
https://ift.tt/3jVNnWX
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.