नवी दिल्ली : Apple सीरीज लाँच इव्हेंटला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ही बहुप्रतीक्षित मालिका १४ सप्टेंबरला लाँच होणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले असून नवीन iPhone 13 सीरीज अंतर्गत कंपनी iPhone 13, iPhone 13 Pro, आणि iPhone 13 Mini बाजारात आणणार आहे. पण, लाँचपूर्वीच , या मालिकेच्या Max च्या टॉप व्हेरियंटचे काही डिटेल्स लीक झाले असून यामध्ये स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये समोर आली आहेत. वाचा: ' किती असेल किंमत? वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी iPhone 13 Pro Max $ १,०९९ म्हणजेच सुमारे ८०,६७९ रुपयांसह लाँच करेल. फोनचा पहिला सेल २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून हा स्मार्टफोन पांढरा, काळा आणि (लाल) रंग पर्यायांसह खरेदी करू शकता. हा फोन गुलाबी रंगात देखील उपलब्ध असेल. संभाव्य तपशील : iPhone 13 Pro Max मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट १२० Hz पर्यंत असू शकतो. डिस्प्लेमध्ये आधी छोट्या नॉच दिल्या जातील, फेस आयडी २.० नंतर त्यात सादर केला जाऊ शकतो. यामध्ये तीन प्रकार मिळतील, ज्यात १२८ GB, ५१२ GB आणि १ TB पर्यंत स्टोरेज येईल. कंपनी या मालिकेत आपला खास लेटेस्ट प्रोसेसर A15 Bionic देखील आणत आहे. फोटोग्राफीसाठी iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. व्हिडीओसाठी, त्यात ProRes फीचर दिले जाऊ शकते. तसेच, फोनमध्ये f / १.८ अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिले जाऊ शकतात. कंपनी या मॉडेलला अॅस्ट्रोफोटोग्राफी मोड देखील देऊ शकते . तर, दुसरीकडे iPhone 13 च्या टॉप मॉडेलमध्ये ४३५२ mAh ची बॅटरी मिळू शकते, जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BXDgHw
https://ift.tt/3zZoBuy

