Type Here to Get Search Results !

TCL चा धमाका! लाँच केला शानदार 'हा' स्मार्टफोन, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : ने ब्राझीलमध्ये आपला नवीन TCL L10 Pro ला लाँच केले आहे. हा एक बजेट फोन असून, यात Unisoc प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि दमदार बॅटरी मिळेल. टीसीएलच्या या फोनची किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: TCL L10 Pro: किंमत व उपलब्धता ची ब्राझीलमध्ये किंमत १,२९९ BRL (जवळपास १८,३०० रुपये) आहे. फोनला इतर बाजारात कधी लाँच केले जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. TCL L10 Pro: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स १० प्रो मध्ये ६.२२ इंच एलसीडी पॅनेल आहे, जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसोबत येतो. स्मार्टफोनमध्ये एक चिन देखील देण्यात आली आहे. यात एचडी+ रिझॉल्यूशनची स्क्रीन मिळेल. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. डिस्प्ले नॉचमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॉडी पॉलीकार्बोनेटची आहे. यात १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सल अल्ट्रवाइड आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. फोनमध्ये रियरला फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळते. टीसीएल एल१० प्रो मध्ये ४ जीबी रॅम आणि Unisoc SC९८६३A चिपसेट मिळेल. यात १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवू शकता. पॉवरसाठी यात ४००० एमएएचची बॅटरी मिळेल. डिव्हाइसमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, ४जी VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट, ३.५ एमएम ऑडिओ जॅक सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. फोन अँड्राइड १० ओएसवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WRQAxV
https://ift.tt/3gZCVfd
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.