Type Here to Get Search Results !

ग्राहकांना पुन्हा एक झटका! आता Samsung Galaxy A52 च्या किमतीत वाढ, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Samsung ने यावर्षी मार्च महिन्यात Samsung Galaxy A 52 लाँच केला असून Galaxy A 52 देशात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे . आता रिलीजच्या सुमारे ५ महिन्यांनंतरच कंपनीने फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची वाढ केली आहे. Galaxy A52 च्या नवीन किमती Samsung.com वर लिस्ट आहेत. जाणून घ्या सविस्तर. वाचा: Galaxy A 52 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६,४९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. किंमतीत वाढ झाल्यामुळे, आता हे दोन्ही प्रकार २७,४९९ आणि २८,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. Galaxy A52 स्मार्टफोन हा २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक आहे. परंतु ग्लोबल सेमीकंडक्टर पुरवठ्याअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून हा हँडसेट भारतात बहुतांश काळापासून उपलब्ध नाहीच. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, मध्ये ६.५ इंच फुलएचडी + इन्फिनिटी-ओ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२० G प्रोसेसर देण्यात आले असून हँडसेटला पॉवर देण्यासाठी ४५०० mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे जी २५ W फास्ट चार्जिंग बॅटरीला सपोर्ट करते. डिव्हाइसमध्ये ६४ मेगापिक्सेल प्राथमिक, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, ५ मेगापिक्सेल मॅक्रो आणि ५ मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. Galaxy A52 Android ११ आधारित OneUI ३.१ स्किन देण्यात आली आहे.तसेच, फोनमध्ये, कंपनीने ३ वर्षांसाठी OS सुधारणा आणि चार वर्षांसाठी सुरक्षा अद्यतनांचे आश्वासन देखील दिले आहे. Samsung Galaxy A52 मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, ३.५ एमएम हेडफोन जॅक, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, सॅमसंग पे आणि आयपी ६७ रेटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Byuuzg
https://ift.tt/3zI1mVZ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.