Type Here to Get Search Results !

६४ मेगापिक्सल कॅमेरासह iQOO Z5 स्मार्टफोन आज करणार एन्ट्री, मिळणार हे जबरदस्त फीचर्स पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ची सब-ब्रँड iQOO आज आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लवकरच हा फोन भारतीय बाजारात देखील एन्ट्री करू शकतो. लाँच होण्यापूर्वी या स्मार्टफोनशी संबंधित काही माहिती समोर आली असून त्यानुसार स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. जाणून घेऊया इतर वैशिष्ट्ये. वाचा: IQOO Z5 स्मार्टफोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन (१०८०x२४०० पिक्सेल) आहे. हा फोन अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून यामध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच, यात ८GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज आहे. IQOO Z5 : कॅमेरा IQOO Z5 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा असेल. ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल आणि ३ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देखील यात आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. IQOO Z5: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी: पॉवरसाठी, iQOO Z5 स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे, जी ४४ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट सारखी सुविधा देण्यात आली आहे. IQOO Z5 स्मार्टफोन Oneplus, Samsung, Xiaomi आणि Oppo सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोसोबत स्पर्धा करेल. सणासुदीच्या काळात या कंपन्या अनेक नवीन फोन बाजारात आणणार असून देखील iQOO Z5 फोन भारतात याच महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lKLPPg
https://ift.tt/2W38ugP
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.