Type Here to Get Search Results !

Airtel: ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील ५ प्लान लाँच, डेटा सोबत कॉलिंगची मजा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन पद्धती अवलंबत आहेत. यातील एक म्हणजे कमी किंमतीत बेस्ट बेनिफिट देणारे प्लान ऑफर करते. हे डोळ्यासमोर ठेवून एअरटेल () आपल्या युजर्ससाठी ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिटचे प्लान आणले आहेत. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, कंपनीने ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील नवीन प्लान लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन प्लानमध्ये १० रुपये, १९ रुपये, २० रुपये, ४८ रुपये, आणि ४९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. या प्लानमध्ये कंपनी युजर्सला डेटा सोबत कॉलिंग बेनिफिट देत आहे. जाणून घ्या डिटेल्स. एअरटेलचा ४९ रुपये आणि ४८ रुपयाचा प्लान ४८ रुपयाचा प्लान एक डेटा अॅड ऑन पॅक आहे. यात कंपनी ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. प्लानची वैधता रनिंग जितकी आहे. तितकी राहील. जर ४९ रुपयाच्या प्लानचा विचार केला तर तुम्हाला १०० एमबी डेटा सोबत ३८.५२ रुपयाचा टॉक टाइम सुद्धा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. एअरटेलचा १० रुपये, १९ रुपये आणि २० रुपयाचा प्लान १० रुपयाच्या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड वैधता सोबत ७.४७ रुपयाचा टॉक टाइम देत आहे. तर १९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला २०० एमबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. प्लानमधील डेटा संपल्यानंतर कंपनी युजर्संना प्रति एमबी डेटा साठी ५० पैसे द्यावे लागते. १९ रुपयाच्या प्लानची वैधता २ दिवसाची आहे. कंपनीच्या २० रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वैधतेचा फायदा मिळतो. प्लानमध्ये कंपनी १४.९५ रुपयाचा टॉक टाइम ऑफर करीत आहे. प्लानमध्ये तुम्हाला डेटा बेनिफिटची कमी आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lNBQc1
https://ift.tt/3zK9Pap
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.