नवी दिल्ली : Apple खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कंपनीने जबरदस्त ऑफर आणली आहे. तुम्ही जर आयफोन १३ ला कमी किंमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. २४ सप्टेंबरला iPhone 13 चा पहिला सुरू होत आहे. या सीरिजमधील सर्व व्हेरिएंट्सची विक्री होणार आहे. तुम्ही या मॉडेल्सला प्री-ऑर्डर देखील करू शकता. प्री-ऑर्डरवर कंपनी शानदार ऑफर देत आहे. या ऑफर्सबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचा: ४६ हजार रुपयांपर्यंत मिळेल सूट ग्राहक Apple च्या अधिकृत वेबसाइट अथवा स्टोरवरून आयफोन १३ ला प्री-ऑर्डर करू शकता. ऑफर अंतर्गत ८९,९०० रुपये किंमतीच्या आयफोनवर कंपनी ४६ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला Apple ची अधिकृत वेबसाइट अथवा अॅपल स्टोरवरून आयफोनला ऑर्डर करावे लागेल. वेबसाइटवरून फोन बुकिंग करताना 'Apple trade-in' चा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडून तुम्ही जुन्या फोनच्या जागी नवीन मॉडेल खरेदी करू शकता. सोबतच, डिस्काउंटचा देखील लाभ घेता येईल. iPhone 13 ला खरेदी करण्यासाठी Apple trade-in पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोनसंबंधित काही प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तुम्ही दिलेल्या प्रश्नांच्या आधारावर कंपनी तुम्हाला एक अंदाजे ट्रेड-इन वॅल्यूची माहिती देईल व फोन खरेदी करताना इंस्टंट क्रेडिट म्हणून ही किंमत कमी करेल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर डिलिव्हरी कधीपर्यंत होईल याची माहिती दिली जाईल. डिलिव्हरीच्या वेळेस तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून नवीन फोन घेता येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kyFpU5
https://ift.tt/3EN2dr5

