Type Here to Get Search Results !

मस्तच! भारतात Flipkart चा स्वस्त स्मार्टफोन येतोय, 'या' तारखेला होणार लाँच, 'इतकी' असेल किंमत

नवी दिल्लीः फ्लिपकार्ट () आपला सब-ब्रँड अंतर्गत स्मार्टफोन घेवून येत आहे. हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट कन्फर्म करण्यात आली आहे. कंपनी या फोनला २५ सप्टेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे. MarQ M3 स्मार्ट, MarQ ब्रँड अंतर्गत येणारा पहिला स्मार्टफोन असणार आहे. फ्लिपकार्ट चे सब-ब्रँड MarQ चा फोकस मुख्य रुपाने टेलिव्हिजन, साउंडबार, वॉशिंग मशीन, एसी आणि मायक्रोवेब्स वर आहे. इतकी असेल फ्लिपकार्टच्या या फोनची किंमत फ्लिपकार्ट वर MarQ M3 Smart स्मार्टफोनचे लँडिंग पेज लाइव्ह झाले आहे. यावरून हा बजेट फोनचे काही प्रमुख फीचर्स आणि डिझाइनचा खुलासा झाला आहे. MarQ M3 Smart च्या पोस्टरवरून दिसते की, यात थिक चिन सोबत वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जावू शकतो. फोनच्या रियर मध्ये ड्युअल कॅमेरा असेल. परंतु, अजून हे स्पष्ट नाही की, फोनच्या रियर मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल की नाही. हा स्मार्टफोन, फ्लिपकार्ट वर लिस्टेड झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये दिसत आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची दमदार बॅटरी इमेज पोस्टरवरून दिसते की, MarQ M3 Smart स्मार्टफोन मध्ये 5,000 mAh ची बॅटरी असेल. पोस्टरच्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे स्टोरेज असेल याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. हा स्मार्टफोन ब्लॅक, आणि ब्लू लाइन अशा २ कलर ऑप्शन मध्ये येवू शकतो. स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला जावू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AyOUbk
https://ift.tt/3lTaukI
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.