नवी दिल्लीः Moto G50 5G Specifications: हँडसेट निर्माता कंपनी Motorola ने या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये आपल्या बजेट जी सीरीजचे अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीच्या या सीरीज अंतर्गत २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Motorola Phones मिळत आहे. या रेंज मध्ये अजूनही कंपनी टॉप अँड फोन Moto G60 आहे. आता कंपनी मिड रेंज मध्ये आपला आणखी एक स्मार्टफोन बाजारात उतरण्याची शक्यता आहे. Motorola Moto G50 5G ला लाँचिंग आधीच गीकबेंचवर लिस्ट करण्यात आले आहे. यातून काही प्रमुख फीचर्स समोर आले आहेत. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: Moto G50 5G चे फीचर्स हा फोन लवकरच लाँच केला जावू शकतो. गीकबेंच लिस्टिंवरून Motorola Phone संबंधी फोन गीकबेंजवर लिस्ट झाला आहे. फोन यूरोपमध्ये लाँच झालेल्या फोनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. डिव्हाइसचे कोडनेम Saipan आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी MT6833V प्रोसेसर जो की Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. वाचा: याशिवाय, गीकबेंच वर फोन ४ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स वर काम करतो. सिंगल आणि मल्टी कोरमध्ये फोनला ५४६ आणि १६९५ स्कोर दिला आहे. फोनची अन्य डिटेल्स लीक झाली आहे. टिप्स्टर इवान ब्लास ने रेंडर्स लीक केले आहे. जे याचे संकेत देतात की फोन वॉटरड्रॉप नॉच आणि फोनच्या फ्रंट मध्ये बॉटम वर चिन थोडा मोटा आहे. वाचा: फोनच्या रियरवर एलईडी फ्लॅश सोबत तीन रियर कॅमेरा आणि सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरला जागा मिळाली आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. अन्य दोन कॅमेरा सेन्सरसंबंधी कोणतीही माहिती मिळाली नाही. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि फोनला पॉवर देण्यासाठी 4700 mAh ची बॅटरी दिली आहे. Motorola ने Moto G50 5G Launch Date वरून अद्याप पडदा हटवला नाही. वाचा: वाचा : वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gj7092
https://ift.tt/3AWSSu8

