Type Here to Get Search Results !

LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली: LG ने Gram सीरीज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच केले असून कंपनीने LG ग्राम लॅपटॉपचे तीन मॉडेल - (मॉडेल 17Z90P), (मॉडेल 16Z90P) आणि LG Gram १४ (मॉडेल 14Z90P) चे नुकतेच अनावरण केले. या लॅपटॉप्सची किंमत ७४,९९९ पासून सुरू होते. सर्व तीन मॉडेल्समध्ये १६:१० आस्पेक्ट रेशो डिस्प्ले आहे आणि लॅपटॉप्स ११ व्या जनरल इंटेल प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. LG Gram लॅपटॉपची नवीन श्रेणीमधील सर्व तीन मॉडेल ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही चॅनेलद्वारे उपलब्ध होतील. वाचा: LG Gram 16 आणि LG Gram 17 लॅपटॉप २५६०x१६०० पिक्सेल रिझोल्यूशनस आणि WQXGA स्क्रीनसह सुसज्ज आहेत. तर, १९२० x १२०० पिक्सेल रिझोल्यूशनसह WUXGA डिस्प्लेसह येतो. डिस्प्ले ९९% DCI-P३ कलर स्पेस देते आणि बाजूस 'सुपर-स्लिम बेझल' असल्याचे सांगितले जाते. तर ९०% स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. नवीन लॅपटॉप इंटेल इव्हो platform प्लॅटफॉर्मसह सुसज्ज आहेत आणि ते ११ व्या जनरल इंटेल कोर TM प्रोसेसरद्वारे आयरिस एक्स ग्राफिक्स आणि वेगवान एलपीडीडीआर ४ एक्स मेमरीसह समर्थित आहेत. LG Gram 17Z90P आणि 16Z90P ८०W बॅटरीसह येतात. LG Gram 17 चे वजन १. ३५ किलो आहे, तर, LG Gram 16आणि 14 चे वजन अनुक्रमे १.१९ किलो आणि ९९९ ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉप थंडरबोल्ट ४ सह येतात. यात यूएसबी ४ सुसंगतता आहे. चार्जिंगसाठी, लॅपटॉप यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहे . USB C प्रकारच्या पोर्टचा वापर करून डिव्हाइस चार्ज केले जाते. सर्व उपकरणांमध्ये अतिरिक्त विस्तार स्लॉटसह एसएसडी स्टोरेज आहे. लॅपटॉप टिकाऊपणा आणि विश्वासार्हतेच्या MIL-STD-810G मिलिटरी मानकांसह येतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lubmOb
https://ift.tt/3CgB9PZ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.