Type Here to Get Search Results !

‘या’ कंपनीच्या प्लानसमोर जिओ देखील फेल, १२० दिवस वैधतेसह मिळेल दररोज २ जीबी डेटा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक उत्तम प्लान्स आणत आहे. यामध्ये ग्राहकांना कमी किंमतीत , कॉलिंग आणि अ‍ॅप्सची सुविधा मिळते. बीएसएनएलच्या प्लानबद्दल सांगायचे तर कंपनी ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा, कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स देत आहे. या प्लानची वैधता १२० दिवस आहे. बाजारात १२० दिवस वैधतेसह येणारा कोणत्याच कंपनीचा प्लान नाही. वाचाः , आणि या कंपन्या २८, ५६, ८४, १८० दिवसानंतर थेट ३६५ दिवस वैधतेसह येणारे प्लान ऑफर करतात. मात्र, बीएसएनएलकडे ९० आणि १२० दिवस वैधतेसह येणारे प्लान्स आहेत. ६६६ रुपयांच्या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. BSNL चा ६६६ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता १२० दिवस असून, यामध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण २४० जीबी डेटा मिळतो. तुम्ही जर ८४ दिवसांपेक्षा जास्त आणि ३६५ दिवसांपेक्षा कमी वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर हा उत्तम पर्याय ठरेल. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील मिळते. याच किंमतीच्या जवळपास जिओ ५९९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. यामध्ये ८४ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण १६८ जीबी डेटा मिळेल. सोबतच, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xm7eSD
https://ift.tt/3imRx9t
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.