Type Here to Get Search Results !

Free 4G Phone : १९९९ रुपयांच्या सिंगल रिचार्जमध्ये फ्री मिळवा 4G फोन, २ वर्षांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज करणे महाग केले आहे. महिन्याभरासाठी आता किमान ३०० रुपये ते ४०० रुपयांचा रिचार्ज केले जाते. दोन वर्षासाठी कमीत कमी ९ हजार ६०० रुपयांपर्यंत रिचार्ज केले जाते. परंतु, तुम्हाला जर फ्री मध्ये ४जी फोन मिळत असेल तर. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून सिंगल रिचार्ज प्लानमध्ये फ्री ४ जी फोन दिला जात आहे. ज्यात फक्त १ हजार ९९९ रुपयाचा रिचार्ज प्लान मध्ये फ्री फोन आणि दोन वर्षासाठी रिचार्ज मिळतो. वाचाः कुठे मिळणार ऑफर जिओ रिचार्ज प्लानला एक्सक्लूसिव जिओ वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. जिओकडून फ्री मोबाइल ऑफर सोबत दोन रिचार्ज प्लानला लिस्ट करण्यात आले आहे. यातील एक प्लान १ हजार ९९९ रुपयांचा आणि दुसरा १ हजार ४९९ रुपयात येतो. या दोन्ही रिचार्ज प्लान मध्ये जिओ फोन दिला जात आहे. ही एक लिमिटेड पीरियड ऑफर आहे. वाचाः जिओचा १९९९ रुपयाचा प्लान जिओचा १ हजार ९९९ रुपयाचा रिचार्ज प्लानमध्ये दोन वर्षाची वैधता सोबत येतो. या प्लानमध्ये फ्री जिओ फोन दिला जात आहे. सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ४८ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. या अॅपमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे. जिओचा १४९९ रुपयाचा प्लान जिओचा १४९९ रुपयाच्या प्लानची वैधता १ वर्षाची आहे. या प्लानमध्ये जिओ फोन फ्री दिला जात आहे. सोबत फोनमध्ये फ्री मध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत २४ जीबी डेटा दिला जातो. हा प्लान जिओ अॅप सब्सक्रिप्शन सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Xt0Pc8
https://ift.tt/3CLD3Is
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.