Type Here to Get Search Results !

एसबीआयने ग्राहकांना केले अलर्ट, त्वरित करा ‘हे’ काम; अन्यथा बँकेतून पैसे काढताना येईल अडचण

नवी दिल्ली : सरकारच्या मालकीची बँक एसबीआयने ग्राहकांना अलर्ट केले आहे. बँकेने ग्राहकांना लवकरात लवकर , लिंक करण्याचे आवाहन केले आहे. एसबीआयने या संदर्भात अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. वाचाः ने ट्विट करत माहिती दिली की, आम्ही ग्राहकांना समस्येपासून लांब ठेवण्यासाठी आणि बँकिंग सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरता यावी यासाठी आधार आणि पॅन कार्डला लिंक करण्याचा सल्ला देतो. एसबीआयने अलर्ट केले आहे की, पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक न केल्यास पॅन कार्डला निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे कोणत्याही व्यवहारासाठी याचा वापर करता येणार नाही. आणि कार्डला लिंक करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. त्यामुळे लवकरात लवकर पॅन-आधार लिंक करणे गरजेचे आहे. पॅन-आधार लिंक करण्यासाठी एसबीआयचे ग्राहक नवीन आयटी पोर्टल https://www।incometax।gov।in/iec/foportal/ वर जाऊ शकतात. नवीन पोर्टलवर पॅन-आधार कसे लिंक कराल ?
  • यासाठी सर्वात प्रथम इनकम टॅक्सच्या पोर्टलवर जावे लागेल. यासाठी तुम्ही https://www।incometax।gov।in/iec/foportal/ या लिंकचा वापर करू शकता.
  • होम पेजवर खाली स्क्रॉल केल्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करा. तुम्ही थेट https://eportal।incometax।gov।in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar वर देखील क्लिक करू शकता.
  • येथे तुम्हाला पॅन, आधार नंबर, आधारवरील नाव आणि १० आकडी मोबाइल नंबर टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला आपको 'I Have Only Year Of Birth In Aadhaar Card' आणि 'I Agree To Validate My Aadhaar Details' चेक करावे लागेल.
  • यानंतर Link Aadhaar पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे काम होईल.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CLAR3G
https://ift.tt/3m2w0p1
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.