नवी दिल्ली : शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अॅप चा कोट्यावधी लोक वापर करतात. भारतात भलेही हे अॅप बंद झाले असेल, मात्र इतर देशांमध्ये याची लोकप्रियता कायम आहे. आता बेरोजगारांची मदत करण्यासाठी टिकटॉकने एक पायलट प्रोग्राम लाँच केला आहे. या अंतर्गत आता यूजर्स आपला रिझ्यूम थेट व्हिडीओच्या माध्यमातून अपलोड करू शकते. सध्या अमेरिकेतील यूजर्ससाठी याची सुरुवात करण्यात आली आहे. यात सुपरस्टारपासून ते शॉपिफायचे सिनियर डेटा इंजिनिअर आणि टिकटॉकचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसरचा देखील समावेश आहे. वाचा: प्रोग्राम अंतर्गत मॅक्सिकन ग्रिल आणि टार्गेट कॉर्प हे यूजर्सचे व्हिडीओ रिझ्यूम स्विकारतील. ही प्रक्रिया ७ जुलैपासून सुरू होईल व ३१ जुलैपर्यंत चालेल. टिकटॉकचा तरुणांकडून मोठ्या प्रमाणावत वापर केला जातो. आता कंपनी एंट्री लेव्हलपासून ते अनुभवी पदांसाठी अनेक जॉब्ससाठी व्हिडीओ रिझ्यूम देण्याची सुविधा उपलबध करत आहे. त्यामुळे यूजर्सला हा प्रोग्राम आवडण्याची शक्यता आहे. व्हिडीओ रिझ्यूम पाठवताना यूजर्सला #TikTokResumes चा वापर करावा लागेल. वाचा: अमेरिकेत कामगारांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतर आता कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. टिकटॉकने #CareerTok सारख्या हॅशटॅग अंतर्गत करिअर आणि संबंधित कॉन्टेंटमध्ये वाढ पाहिली. डेटिंग अॅप Bumble Inc आणि Facebook सह अनेक कंपन्या यूजर्सला नेटवर्क आणि नोकऱ्या शोधण्यासाठी मदत करत आहे. मात्र, Microsoft Corp चे LinkedIn आजही प्रोफेशनल्ससाठी उत्तम साइट आहे. काही दिवसांपूर्वी भारतासह ज्या देशात बंदी घालण्यात आली आहे तेथे आपले एआय आधारित तंत्रज्ञानाची विक्री करत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, २०२० मध्ये भारत सरकारने चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. यात टिकटॉकचा देखील समावेश होते. यामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देण्यात आले होते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UtVtf9
https://ift.tt/3jSZ4y7

