Type Here to Get Search Results !

Nokia चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज, २० वर्षानंतर नवीन व्हेरियंट मध्ये आला क्लासिक Nokia 6310

नवी दिल्लीः ने काही वर्षापूर्वी Nokia ब्रँडचे लायसन्स मिळवले होते. तेव्हापासून कंपनी लागोपाठ क्लासिक नोकिया फीचर फोन्सला नवीन व्हेरियंट मध्ये लाँच करीत आहे. आता कंपनीने खूपच पॉप्यूलर असलेला क्लासिक ला मॉडर्न फीचर्स सोबत रिलीज केले आहे. २०२१ एडिशन एक नवीन एलिगेंट परंतु, ओळख असलेल्या नवीन बॉडी सोबत आला आहे. वाचाः नवीन नोकिया ६३१० मध्ये कंपनीने काही मॉडर्न बदल केले आहेत. परंतु, २०२१ मध्ये आलेल्या ओरिजनल फोनचे कँडी बार डिझाइन तशीच ठेवली आहे. जुन्या फोनमध्ये ज्या ठिकाणी स्पीपकरची डिझाइन वेगळी देण्यात आली होती. आता नवीन व्हर्जन मध्ये ईयरपीस साठी एक सिंपल हॉरिझॉन्टल स्लिट आहे. मोनोक्रोम ६ लाइन डिस्प्लेच्या जागी नवीन नोकिया ६३१० मध्ये कर्व्ड कलर डिस्प्ले दिला आहे. जो आधीच्या तुलनेत मोठा आहे. २०२१ मध्ये आलेल्या नवीन नोकिया फोनमध्ये रियर कॅमेरा सुद्धा दिला आहे. वाचाः नवीन नोकिया ६३१० ला आता यूरोप मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याला नोकिया मोबाइलच्या अधिकृत वेबसाइटवरून €59.90 जवळपास ५ हजार ३०० रुपये किंमतीत खरेदी करू शकता येते. दुसऱ्या मार्केट्समध्ये कंपनी हा फोन कधीपर्यंत लाँच करणार, यासंबंधी कंपनीकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आली नाही. वाचाः Nokia 6310 (2021) फीचर्स Nokia 6310 (2021) मध्ये २.८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये UNISOC 6531F प्रोसेसर, 8MB रॅम आणि 16MB इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोन Series 30+ (S30+) ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. हँडसेट मध्ये आयकॉन आधीच्या तुलनेत मोठा आणि वाचण्यासाठी सोपे करण्यासाठी मेन्यूला झूम करण्यात आले आहे. फोनमध्ये एक अॅक्सेसिबिलिटी मोड दिला आहे. जो मेन्यूला आणखी सिंपल बनवतो. वाचाः नोकिया ६३१० मध्ये ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. जो एलईडी फ्लॅश सोबत येतो. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. जो युजर्संना ३२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. हँडसेट मध्ये ब्लूटूथ ५.०, वाय फाय, ड्युअल सिम सपोर्ट आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये 1150mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी २००१ मध्ये आलेल्या मॉडल पेक्षा थोडी मोठी आहे. परंतु, नोकियाचा दावा आहे की, याला ७ तासांचा टॉकटाइम मिळेल. बॅटरीला फोनमधून रिमूव्ह केले जावू शकते. फोन सोबत बॉक्समध्ये चार्जर आणि मायक्रो यूएसबी केबल मिळते. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iRjtBp
https://ift.tt/2UTixV5
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.