नवी दिल्लीः AGM रिलायंस इंडस्ट्रीची ४४ वी वार्षिक जनरल मीटिंगला सुरूवात झाली आहे. या बैठकीत मुकेश अंबानी फोनची घोषणा करण्याची शक्यता आहे. पाहा ताजे अपडेट्स >> रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी बैठकीला सुरूवात करताना म्हटले की, करोना महामारी असूनही कंपनीने यावर्षी चांगले प्रदर्शन केले. >> रिलायन्स फाउंडेशनने करोना महामारीत राष्ट्र आणि लोकांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाउंडेशनने ऑक्सिजन मिशन, वॅक्सिन सुरक्षासह पाच मिशन लाँच केले. – नीता अंबानी >> केवळ मुंबईतच ८७५ बेड कोविड केअर सेंटरसाठी दिले. ऑक्सिजन जनरेटर इंस्टॉल करण्यास देखील मदत केली. - नीता अंबानी >> महिलांसाठी रिलायन्स फाउंडेशनने खूप काम केले. महिलांसाठी अनेक योजनांवर काम करत आहे. – नीता अंबानी >> आम्ही देशात प्रत्येकी १० पैकी एका कोविड रुग्णाला ऑक्सिजन देत आहोत व ही सेवा मोफत देत आहोत - नीता अंबानी >> आम्ही दररोज १५ हजार चाचणी क्षमतेसह कोविड टेस्ट लॅब देखील सुरू केली - नीता अंबानी >> फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब वर असे पाहाः Reliance Jio AGM 2021 ला लाइव Reliance Jio AGM 2021 ला सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर लाइव पाहिले जाऊ शकते. या मीटिंगला फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्यूबवर पाहिले जाऊ शकते. >> रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक बैठक २ वाजता सुरू झाली आहे. कंपनी आजा 5 जी नेटवर्कसह अन्य घोषणा करण्याची शक्यता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w25o93
https://ift.tt/362nBJ3

