नवी दिल्ली. स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुम्हाला त्यासाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. कारण, अलीकडेच अनेक स्मार्टफोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यात झिओमी, रियलमी, व्हिवो, मायक्रोमॅक्ससह इतर अनेक कंपन्यांचे फोन आहेत. किंमती वाढविण्या मागील कंपन्यांचा हेतू काय आहे हे सांगणे कठीण आहे. आज आम्ही आपल्याला अशाच स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत ज्यांना खरेदी करतांना तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. यामध्ये रेडमी नोट 10 ते मायक्रोमॅक्स Note 10 पर्यंत बरेच फोन समाविष्ट आहेत. वाचा : Note 10: या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत पूर्वी १३,९९९ रुपये होती. आता ती १४,९९९ इतकी झाली आहे. यात एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आधी ११,९९९ रुपये होती ती आता वाढून १२,४९९ इतकी झाली आहे. Realme C25s: या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आधी ९,९९९ रुपये होती. यात आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून नवी किंमत १०,४९९ रुपये इतकी आहे. या फोनचे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १०,९९९ रुपयांऐवजी आता ११,४९९ रुपयांमध्ये खरेदी करावे लागेल. Vivo Y1s: फोनच्या २ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत आधी ७,९९० रुपये होती. आता ती ८,४९० इतकी झाली आहे. म्हणजेच यात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. Vivo Y12s: या फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत पूर्वी ९,९९० रुपये होती. आता त्यात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन किंमत १०,४९० आहे. Redmi Note 10 Pro : या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत यापूर्वी १६,९९९ रुपये होती. आता यात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन किंमत १७,४९९ इतकी आहे. Motorola Moto 40 फ्यूजनः यापूर्वी या फोनच्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये होती. आता हा फोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला १४,४९९ रुपये मोजावे लागतील. यात ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मोटोरोला मोटो जी ४० फ्यूजनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Micromax Note 10 S: या फोनच्या ४ जीबी रॅम आणि या फोनच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपयांवरून ११,४९९ रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन खरेदी करायचा असल्यास अतिरिक्त ५०० रुपये द्यावे लागतील. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gYPUwQ
https://ift.tt/3gUKtiw

