Type Here to Get Search Results !

आत्मनिर्भरतेचा विसर, एका स्मार्टफोन सीरीजमुळे ३३०० कोटी रुपये चीनला गेले

नवी दिल्लीः भारतात चीनी स्मार्टफोन्सला भारतीयांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शाओमी कंपनीने दावा केला आहे की, फक्त एका स्मार्टफोनची सीरीजची भारतात विक्री करून कंपनीने ३ हजार कोटी रुपये कमावले आहे. वाचाः शाओमीचा दावा आहे की, रेडमी नोट १० सीरीजच्या २० लाख युनिट्सची भारतात विक्री करण्यात आली आहे. रेडमी नोट १० सीरीजला कंपनीने भारतात याच महिन्यात लाँच केले होते. अंतर्गत Redmi Note 10, Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max लाँच करण्यात आले होते. यानंतर कंपनीने Redmi Note 10s स्मार्टफोन्सला सुद्धा लाँच केले होते. वाचाः भारतीय मार्केटमध्ये चीनी स्मार्टफोन्सचा कब्जा आहे. शाओमीने २०२१ च्या पहिल्या तिमाहित कंपनीकडे भारतीय स्मार्टफोन्स मार्केटमध्ये २६ टक्के शेयर होते. रेडमी नोट १० शिवाय, कंपनीने सांगितले की, Mi 11 सीरीज सुद्धा जबरदस्त विक्री झाली आहे. शाओमीने दावा केला आहे की, Mi 11 सीरीजच्या दोन डिव्हाइसमधून कंपनीने ३०० कोटी रुपयाच्या फोनची विक्री केली आहे. Mi 11 सीरीजला कंपनीने २३ एप्रिलला लाँच केले होते. म्हणजेच ३०० कोटी रुपये फक्त ३४ दिवसांत कंपनीने कमावले आहे. Mi 11 सीरीज अंतर्गत कंपनीने Mi 11 Ultra ला भारतात लाँच केले होते. याची किंमत ७० हजार रुपये होती. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद न मिळाल्याने याची विक्री टाळण्यात आली होती. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3giuAn6
https://ift.tt/2SmobOA
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.