नवी दिल्ली.फोनमध्ये आपले फोटो, व्हिडिओही सेव्ह केले जातात. मेलवर येणारी कागदपत्रेही फोनमध्ये सेव्ह केली जातात. बर्याच काम करण्यामुळे आणि सर्व गोष्टी सेव्ह करण्यामुळे फोनची स्टोरेज क्षमता कमी होते आणि त्याचा फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. तुमच्या देखील फोनचा परफॉर्मन्स बिघडला असेल तर या टिप्सच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवता येईल. जाणून घ्या या टिप्सबद्दल. वाचा : मेल वरील अनावश्यक फाईल्स डिलीट करा आपण बर्याचदा मेलद्वारे फोनवर फाइल्स डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर आपण हमखास विसरतो की ते कुठेतरी सेव्ह झाले आहे. अशा परिस्थितीत, आपल्या फोनच्या डाउनलोडवर जा आणि अनावश्यक फाइल डिलीट करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला मोकळी जागा मिळेल. अनेक क्लिनिंग Apps वापरू नका जेव्हा वापरकर्ते अनेक क्लीनिंग अॅप्स वापरतात. तेव्हा देखील फोनचे Storage व्यापले जाते. यावर उपाय म्हणून गुगल अॅपद्वारे गुगलच्या फाईल्स वापरा. हे क्लीनिंग अॅप म्हणून देखील काम करते. हे आपली संचय क्षमता देखील सुधारित करते. अनावश्यक व्हिडीओज डिलीट करा आपण दररोज व्हॉट्सअॅप किंवा इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने येणारे व्हिडिओ फोनमध्ये सेव्ह करता. या सर्व व्हिडिओंचा काही उपयोग नाही. बरेच व्हिडिओ मजेदार असतात.हे मान्य आहे. पण, ते दिलीत केल्यास फोनची स्टोरेज क्षमता परत मिळू शकेल. वापरात नसलेले Apps लगेच काढून टाका फोनमध्ये अनेक अप्स असतात, ज्यांचा काहीच उपयोग नसतो किंवा ती वारंवार वापरण्यात येत नाही. असे Apps लगेच डिलीट करा. न वापरलेले अॅप्स हटविणे स्टोरेज नियंत्रित करण्यात सर्वात प्रभावी आहे. यासह फोनच्या स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करता येते. कॅशे क्लिअर करा कॅशेमध्ये बर्याच गोष्टी सेव्ह केल्यामुळे काही दिवसात हा स्टोरेज मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अॅप्स आणि वेबसाइट लोडिंग वेळ कमी करण्यासाठी भरपूर डेटा कॅशे करतात. कॅशे मेरी हटवा. यामुळे बरीच जागा मोकळी होईल. वाचा: वाचा: वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wHTKAN
https://ift.tt/3c5nNua

