Type Here to Get Search Results !

सर्वात स्वस्त रिचार्ज! Jio कडे आहे फक्त ७५ रुपयांचा शानदार प्लान, डेटा-कॉलिंगचा मिळेल फायदा; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी , , आणि आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक यूजर्स प्लान्स आणत असतात. कमी किंमतीत येणाऱ्या प्लान्समध्ये जास्त डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. गेल्यावर्षी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर आता सुरुवाती प्रीपेड रिचार्जची किंमत जवळपास १०० रुपये झाली आहे. मात्र, Reliance कडे एक असा प्लान आहे, जो खूपच स्वस्त आहे. या प्लानमध्ये कॉलिंगसह डेटाचा देखील फायदा मिळेल. परंतु, या प्लानचा फायदा घेण्यासाठी तुम्ही यूजर असणे गरजेचे आहे. या स्वस्त प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: JioPhone ७५ रुपयांचा प्लान टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे JioPhone यूजर्ससाठी फक्त ७५ रुपये किंमतीत येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला एकूण २.५ जीबी डेटा दिला जात आहे. यात दररोज १०० एमबीसह अतिरिक्त २०० एमबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानची वैधता ३ दिवस आहे. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा दिली जात आहे. यात ५० एसएमएस मोफत मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud या अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. JioPhone यूजर्ससाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा आणखी एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची किंमत ९१ रुपये असून, यात देखील अनेक बेनिफिट्स मिळतात. ९१ रुपयांच्या या प्लान्सची वैधता २८ दिवस आहे. यात दररोज १०० एमबीसह २०० एमबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळतो. म्हणजेच, संपूर्ण कालावधीसाठी एकूण ३ जीबी डेटा मिळतो. तसेच, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यात ५० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud या अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. दरम्यान, लक्षात ठेवा की हे दोन्ही प्लान्स यूजर्ससाठी आहेत. तुम्ही जर जिओफोन वापरत असाल तर या प्लान्सचा फायदा घेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QAMxBIa
https://ift.tt/a47WZbA
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.