Type Here to Get Search Results !

५६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि डेली १.५ GB डेटासह येणाऱ्या 'या' प्लान्समध्ये मिळतात 'हे' जबरदस्त बेनिफिट्स

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त आणि जोरदार फायदे देणारे प्लान्स ऑफर करत असतात. यात अनलिमिटेड कॉलिंग ते मेसेजेस पर्यंत अनेक बेनिफिट्स दिले जातात. याच टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी डेली डेटासह अनेक प्रीपेड प्लान ऑफर करतात. काही ग्राहक सर्वात स्वस्त प्लान शोधत असताना, मोठ्या संख्येने Daily १.५ GB डेटासह प्लानला प्राधान्य देतात. यामध्ये तुम्हाला दररोज पुरेसा इंटरनेट डेटा मिळतो आणि इंटरनेटच्या आवश्यक त्या गरजा देखील पूर्ण होतात. आज येथे आम्ही तुम्हाला Reliance जिओ, Airtel आणि Vodafone-Idea च्या ५६ दिवसांच्या वैधतेसह येणार्‍या अशा प्लान्सबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. वाचा: चा डेली १.५ GB आणि ५६ दिवसांचा प्लान : रिलायन्स जिओचा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. यामध्ये तुम्हाला ५६ दिवसांच्या वैधतेसाठी दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. हा प्लान अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज १०० एमएसएस ऑफर करतो. यासोबतच जिओ अॅप्लिकेशनमध्ये प्रवेश देखील उपलब्ध आहे. Jio अॅप्समध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jionews सारख्या अॅप्सचा समावेश आहे. Airtel चा डेली १.५ GB आणि ५६ दिवसांचा प्लान: Airtel चा मिड-टर्म प्लान देखील किमतीच्या बाबतीत Jio सारखाच आहे. एअरटेलच्या प्रीपेड प्लॅनची किंमत ४७९ रुपये आहे, ज्यामध्ये ५६ दिवसांच्या वैधतेसह १.५ GB प्रति दिन दिले जाते. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस प्रतिदिन तसेच मोबाईल एडिशन Amazon Prime Video मोफत ट्रायल, मोफत HelloTunes आणि Wynk Music ची मोफत सदस्यता देखील देते. Vodafone-idea चा १.५ GB डेली आणि ५६ दिवसांचा प्लान: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की Vodafone-Idea देखील त्याच किंमतीचा प्लान ऑफर करते. यामध्ये ५६ दिवसांसाठी दररोज १.५ GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलचे फायदेही मिळत आहेत. याशिवाय, V Movies & TV, Binge All Night आणि Weekend Data Rollover ची सुविधा देखील दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Mgt25NA
https://ift.tt/x3IEtVk
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.