Type Here to Get Search Results !

स्मार्टफोन चार्जिंग करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा बॅटरी होईल खराब

नवी दिल्ली: आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात पाहायला मिळतो. स्मार्टफोनची विशेष काळजी देखील घेणे गरजेचे आहे. स्क्रीन गार्डपासून देखील ते बॅक कव्हरद्वारे आपण फोनला सुरक्षित ठेवत असतो. मात्र, हँडसेटच्या चार्जिंगबाबत एवढे सावध नसतो. अनेकदा बाहेर असताना कोणत्याही चार्जरने फोन चार्जिंग करतो. यामुळे फोन खराब होण्याची शक्यता असते. फोन चार्जिंग करताना काळजी न घेतल्यास केवळ चार्जरच नाही तर याचा फोनवर देखील परिणाम होतो. बनावट चार्जरने फोन चार्ज केल्याने बॅटरी खराब होते व काही दिवसांनी फोन फास्ट चार्ज होणे बंद होते. त्यामुळे फोन चार्ज करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पुढील टिप्स उपयोगी येतील. वाचा: स्वस्त वापरणे पडेल महागात अनेकदा फोनसोबत आलेला चार्जर खराब झाल्यानंतर आपण बाजारातून स्वस्त चार्जर खरेदी करतो. ओरिजिनल चार्जरची किंमत जास्त असल्याने आपण कमी किंमतीत बाजारात उपलब्ध असलेला बनावट चार्जर घेऊन येतो. मात्र, पैसा वाचवण्याच्या नादात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. बनावट केबलमुळे चार्जर खराब होऊ शकतो. या बनावट केबल फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नाही. यामुळे चार्जिंगवर देखील परिणाम होतो. इतरांच्या चार्जरचा वापर करणे टाळा फोन चार्जिंग करताना आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे दुसऱ्याचा चार्जर वापरणे. घरी असल्यास आपण फोनसोबत आलेल्या ओरिजिनल चार्जरचा वापर करतो. मात्र, ऑफिसमध्ये असल्यावर अथवा इतर ठिकाणी असल्यास आपण इतरांकडे चार्जर मागून फोन चार्ज करतो. यामुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. प्रत्येक फोनचे स्वतःचे सॉफ्टवेअर, वेगळी बॅटरी असते. तसेच, चार्जिंग देखील वेगळे असते. इतर मॉडेलचा चार्जर वापरून फोन खराब केल्यास चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकतो. तसेच, चार्जिंग स्पीड आणि बॅटरीच्या क्षमतेवर देखील परिमाम होतो. ओरिजनल चार्जरचा करा वापर फोन चार्ज करण्यासाठी कधीही फोनसोबत मिळालेल्या ओरिजिनल चार्जरचाच वापर करावा. यामुळे फोन फास्ट चार्ज होईलच, सोबतच बॅटरी, चार्जिंग पोर्ट आणि चार्जर देखील व्यवस्थित राहील. फोनसोबत आलेला मूळ चार्जर खराब झाला तरीही थोडे अधिक पैसे खर्च करून ओरिजिनल चार्जरच खरेदी करावा. हे चार्जर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट्सवर सहज मिळतील. यामुळे तुमच्या फोनला कोणतेही नुकसान पोहचणार नाही. त्यामुळे फोन खराब होऊ नये असे वाटत असल्यास बनावट चार्जरचा वापर करणे टाळा. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EJBwzom
https://ift.tt/BP3ns4u
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.