Type Here to Get Search Results !

YouTube Video: मेगाहिट 'डेस्पासिटोला' मागे टाकत या YouTube Video ने मिळविले तब्बल १००० कोटी व्ह्यूज, तुम्ही हा Video पाहिला?

नवी दिल्ली: Video स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर दररोज लाखो Video पाहिले जातात. मात्र, यातील काही व्हिडिओ असे असतात. ज्यांना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडिओ आहे - बेबी शार्क डान्स. हा व्हिडिओ जगात सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे. जगभरात १००० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज असलेला हा पहिला YouTube व्हिडिओ बनला आहे. विशेष म्हणजे याआधी कोणत्याही यूट्यूब व्हिडिओला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत. वाचा: ला टाकले मागे: बेबी शार्क व्हिडिओ हा एक जागतिक स्तरावर गाणे आणि नृत्य व्हिडिओ आहे. यामध्ये कार्टून कॅरेक्टरचा वापर करण्यात आला असून हा व्हिडिओ ट्रॅक दक्षिण कोरियन संगीतासह सादर करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या ट्रॅकने लुईस फोन्सी आणि डॅडी यांकीच्या मेगाहिट डेस्पॅसिटोच्या संगीत व्हिडिओला मागे टाकले आहे. ज्याने ७.७ अब्ज व्ह्यूज मिळविले असल्याचे वृत्त योनहाप न्यूज एजन्सीने दिले आहे. २०१६ मध्ये डान्स व्हिडिओ रिलीज झाला होता: बेबी शार्क व्हिडिओ आजपासून सुमारे ६ वर्षांपूर्वी जून २०१६ मध्ये प्रथम रिलीज झाला होता. हे कोरियन बँड पिंकफॉन्ग मालिकेतील मुलांचे गाणे आहे. हे गाणे त्याच्या आकर्षक ट्यून आणि आकर्षक गीतांमुळे मुलांमध्ये जगभरात लोकप्रिय आहे. या गाण्याला नोव्हेंबर २०२० मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे शीर्षक मिळाले होत. त्यावेळी या व्हिडिओला सुमारे ७ अब्ज व्ह्यूज मिळाले होते. तेव्हापासून १५ महिन्यांत, हा व्हिडिओ सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंच्या यादीत अव्वल आहे. जागतिक लोकसंख्येपेक्षा जास्त व्ह्यूज: एक मजेदार गोष्ट म्हणजे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) च्या अहवालानुसार, जगाची एकूण लोकसंख्या सुमारे ७८० कोटी आहे. पण, बेबी शार्कचा Video तब्बल १००० कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fnLpeR
https://ift.tt/3Gwjju2
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.