Type Here to Get Search Results !

Recharge Plans: एकच नंबर! फक्त ७ रुपये खर्चून दररोज मिळेल ५ जीबी डेटा, ‘ही’ कंपनी देत आहे जबरदस्त बेनिफिट्स

नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीनंतर सुरू झालेले दोन वर्षांनंतर देखील सुरूच आहे. घरूनच ऑफिसचे काम आणि ऑनलाइन क्लासेस सुरू असल्याने डेटाचा देखील जास्त वापर होतो. त्यामुळे कमी किंमतीत जास्त डेटा आणि वैधतेसह येणारे प्लान्स आपण शोधत असतो. सरकारी टेलिकॉम कंपनी कडे असाच एक शानदार प्लान असून, ज्यात अनेक फायदे मिळतात. या प्लानविषयी जाणून घेऊया. वाचा: BSNL चा ५९९ रुपयांचा प्लान ५९९ रुपये BSNL च्या या स्पेशल टेरिफ वाउचर प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळत आहे. या प्लानमध्ये दररोज ५ जीबी डेटा मिळतो. ५ जीबी डेटा समाप्त झाल्यानंतर ८० Kbps च्या स्पीडने डेटा वापरू शकता. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. BSNL चा २५१ रुपयांचा प्लान BSNL कडे वर्क फ्रॉम होमसाठी आणखी एक शानदार प्रीपेड प्लान आहे. या प्लानची किंमत २५१ रुपये असून, यामध्ये ३० दिवसांसाठी दररोज ७० जीबी डेटा मिळतो. हा प्लान केवळ जास्त डेटा वापरणाऱ्या यूजर्ससाठी आहे.या प्लानसोबत कॉलिंग अथवा एसएमएसचा फायदा घेण्यासाठी यूजर्सला वेगळे रिचार्ज करावे लागेल. तसेच, १५१ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ३० दिवसांसाठी एकूण ४० जीबी डेटा मिळतो. हे प्लान्स सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A2DA87
https://ift.tt/3tyxDyi
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.