नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त एसएमएस बंडल लाँच केला आहे. टॅरिफमध्ये वाढ झाल्यानंतर एसएमएस बंडल प्रीपेड प्लान्स महाग झाले आहेत. त्यानंतर ट्रायने कंपन्यांना मोफत पोर्ट एसएमएसची परवानगी देण्याचे आदेश दिले होते. यानंतर जिओने स्वस्त एसएमएस बंडल प्रीपेड प्लान सादर केला होता. वाचा: आता एअरटेलने देखील एसएमएस बेनिफिट्ससह येणारा आपला स्वस्त प्लान सादर केला आहे. एअरटेलच्या या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. Airtel चा ९९ रुपयांचा प्लान एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान सादर केला असून, यात एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि वॉइस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. यूजर्सला यात ९९ रुपये टॉकटाइम, २०० एमबी डेटा, एक पैसा प्रती सेकेंद कॉलिंग आणि लोकल एसएमएससाठी १ रुपये, तर एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये खर्च करावे लागतील. या प्लानची वैधता एकूण २८ दिवस आहे. एअरटेलच्या प्लानपेक्षा जिओचा प्लान २० रुपये महाग आहे. मात्र, जिओच्या प्लानमध्ये अनलिमिटेड बेनिफिट्स मिळतात. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि १४ दिवसांसाठी अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय यूजर्सला प्लानमध्ये JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारख्या अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. एअरटेलचा ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान यूजर्सला सर्वात कमी किंमतीत एसएमएस बेनिफिट्स देणारा प्लान आहे. यात इतर बेनिफिट्स मिळत नसले तरी, वॉइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्स मात्र मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pkSCCp
https://ift.tt/30NNDR2

