Type Here to Get Search Results !

Masked Aadhaar Card: मास्क आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे माहित नसल्यास फॉलो करा 'या' स्टेप्स

नवी दिल्ली : Aadhar Card मध्ये आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता आणि आधार कार्डचा युनिक क्रमांक असतो. पण, तुम्हाला Masked आधार कार्डबद्दल माहिती आहे का? जर तुमचे उत्तर नाही असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मास्क आधार कार्डवर तुमच्या आधारचे सुरुवातीचे आठ क्रमांक लपवलेले असतात आणि फक्त शेवटचे चार अंक दिसतात. वाचा: आजच्या काळात हा एक ट्रेंड आहे, आणि तुम्ही घरी बसल्या मिनिटांत तुमच्या मोबाईल फोनवर किंवा कम्प्युटरमध्ये ते सहज डाउनलोड करू शकता. तुम्हालाही हे मास्क केलेले आधार कार्ड घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला ते डाउनलोड करण्याच्या सोप्पी ट्रिक्स सांगत आहो. जाणून घेऊया प्रक्रिया. Masked आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि येथे दिसत असलेल्या Download Aadhar च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला आधार / व्हीआयडी / एनरोलमेंट आयडी या पर्यायावर जावे लागेल आणि येथे जाऊन Masked आधार कार्डवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमची अनेक महत्त्वाची माहिती विचारली जाईल, जी तुम्हाला येथे भरायची आहे. यानंतर, तुम्हाला येथे दिसत असलेल्या रिक्वेस्ट ओटीपीसह बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी येईल (आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक). हे प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला डाउनलोड आधार या पर्यायावर क्लिक करावे लागेल, ज्यावरून तुमचे Masked आधार कार्ड डाउनलोड केले जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dDbtly
https://ift.tt/3oIatTk
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.