Type Here to Get Search Results !

Laptop Offers: फक्त १९ हजारांमध्ये घरी आणा ४६ हजार रुपये किमतीचा हा HP लॅपटॉप, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल १६ डिसेंबरपासून सुरू झाला असून यामध्ये कपडे आणि रेशनपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व प्रकारच्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली जात आहे. आज आम्ही अशा लॅपटॉप डीलबद्दल सांगणार आहो. ज्यामध्ये, तुम्हाला HP चा पॉवरफुल लॅपटॉप ४६ हजार रुपयांऐवजी फक्त १९ हजार रुपयांमध्ये मिळू शकेल. जाणून घेऊया कसे. वाचा: HP लॅपटॉपवर प्रचंड सवलत : Flipkart च्या Big Diving Days सेलमध्ये, तुम्हाला २५६ GB SSD सह HP लॅपटॉपवर प्रचंड सूट मिळत आहे. ४६,०५५ रुपये किमतीचा हा लॅपटॉप तुम्ही १५ % च्या सवलतीनंतर फ्लिपकार्टवरून ३८,९९० रुपयांना घरी घेऊ शकता. SBI चे क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला १०% म्हणजेच १,५०० रुपयांची इन्स्टंट सूट मिळेल, ज्यामुळे लॅपटॉपची किंमत ३७,४९० रुपये होईल. या लॅपटॉप डीलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या लॅपटॉपच्या बदल्यात हा उत्तम HP लॅपटॉप खरेदी करून १८,१०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळत असेल तर तुम्ही हा लॅपटॉप फक्त १९,३९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एकूणच, या डीलमध्ये तुम्हाला २६,६६५ रुपयांची सूट मिळू शकते. या HP लॅपटॉपमध्ये काय खास आहे? पातळ आणि हलका लॅपटॉप दिसायला अतिशय स्टायलिश आहे. हा लॅपटॉप १५. ६ इंच फुल एचडी मायक्रो-एज अँटी-ग्लेअर डिस्प्ले आणि २२० nits ब्राइटनेससह येतो. विंडोज १० होमवर काम करणाऱ्या या लॅपटॉपमध्ये तुम्हाला ८ GB रॅम आणि २५६ GB SSD मिळेल. बिल्ट-इन ड्युअल स्पीकर्ससह, तुम्हाला एक USB टाइप-सी पोर्ट, दोन USB टाइप-ए पोर्ट, एक HDMI पोर्ट आणि मल्टी-फॉर्मेट SD मीडिया कार्ड रीडर मिळेल. हा लॅपटॉप एक वर्षाची ऑनसाइट वॉरंटी आणि एक वर्षाची डोमेस्टिक वॉरंटी देतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EbSDfY
https://ift.tt/3Fd0eME
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.