Type Here to Get Search Results !

तुमची पार्टी दणाणून सोडणार Xiaomi चा नवीन साउंडबार, लवकरच होणार लाँच; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने आपला नवीन Soundbar 3.1ch ची घोषणा केली आहे. लाँचआधी कंपनीने ट्विटरवर साउंडबारच्या काही स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये वन-टच NFC पेअरिंग सपोर्ट आणि ४३० वॉट मॅग्झिमम आउटपूट मिळेल. यात डॉल्बी एटमॉस सपोर्ट आणि वायरलेस सबवूफर दिले आहेत. वाचा: Xiaomi ने नवीन चे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये साउंडबारच्या डिझाइनबद्दल माहिती मिळते. नवीन ब्लॅक रंगात येतो. डिव्हाइसमध्ये फ्रंटला स्मार्ट एलईडी डिस्प्ले दिला आहे. तसेच, वरच्या बाजूला पॉवर बटन, वॉल्यूम बटन आणि कनेक्शन टॉगल्स दिले आहेत. Xiaomi Soundbar 3.1ch हा Dolby audio आणि DTS Virtual:X sound सह येईल. यात मेन यूनिटमध्ये वायरलेस सबवूफर मिळेल. सोबतच, ४३० वॉट मॅग्झिमम आउटपूट मिळतो. यात प्रमाणे वॉल माउंटिंग देखील पाहायला मिळते. दरम्यान, कंपनीने या नवीन प्रोडक्टच्या लाँच तारीख, किंमतीबाबत माहिती दिलेली नाही. Xiaomi Mi Soundbar ला भारतात ४,९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. यात दोन २० एमएम डोम स्पीकर्स आणि दोन २.५ इंच वूफर्स दिले आहे. यात ८ ड्राइव्हर्स दिले असून, यात दोन ट्वीटर्स, दोन मिड-रेंज ड्रायव्हर्स आणि बेससाठी चार पॅसिव्ह रेडिएटर्स मिळतात. या साउंडबारला विना रिमोटसह सादर केले होते. त्यामुळे अपकमिंग Xiaomi Soundbar 3.1ch सह रिमोट मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ncmnEh
https://ift.tt/3FaCGrl
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.