Type Here to Get Search Results !

WhatsApp ने बंद केलेत २२ लाखांहून जास्त अकाउंट, युजर्संनी या चूका टाळाव्यात

नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी नवीन फीचर संबंधी नाही तर आपल्या एका निर्णयाने आले आहे. व्हाट्सअॅपने २२ लाखांहून जास्त व्हाट्सअॅप अकाउंट्स बंद केले आहेत. याचा खुलासा कंपनीच्या मासिक रिपोर्टमधून करण्यात आला आहे. ज्या व्हाट्सअॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी नियम मोडला होता. जाणून घ्या डिटेल्स. यूजर्सच्या तक्रारीनंतर होवू शकते कारवाई व्हाट्सअॅपने आपल्या युजर्सच्या सेफ्टी आणि सिक्योरिटीला डोळ्यासमोर ठेवून त्या युजर्संवर बंदी घातली आहे. ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले होते. व्हाट्सअॅपच्या यूजर सेफ्टी रिपोर्ट वरून हे उघड झाले आहे. या अकाउंट्सची संख्या २२ लाख ९ हजार आहे. व्हाट्सअॅपने म्हटले की, या यूजर सेफ्टी रिपोर्टमध्ये युजर्सकडून आलेल्या तक्रारीनंतर त्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हाट्सअॅपने सरकारला माहिती दिली आहे, की सप्टेंबर महिन्यात अकाउंट सपोर्ट, बंदी अपील, अन्य सपोर्ट व प्रोडक्ट सपोर्ट आणि सेफ्टी कॅटेगरीत ५६० यूजर जनरेटेड तक्रारी मिळाल्या होत्या. या रिपोर्ट्सच्या डिटेल्स मध्ये अकाउंट सपोर्ट (१२१), बंदी अपील (३०९), अन्य सपोर्ट व प्रोडक्ट सपोर्ट (४९) आणि सेफ्टी (३२) याचा समावेश आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हाट्सअॅप एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्विस देणारे आणि मेसेजिंग दुरुपयोगला रोखण्यासाठी लिडिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षात आम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या युजर्संना सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि अन्य दुसरी टेक्नोलॉजी, डेटा तज्ज्ञ आणि जाणकार यात लागोपाठ सूचना करीत आहेत. असं ठेवा अकाउंट सेफ कंपनीच्या माहितीनुसार, जर कोणी गैर पद्धतीने, अश्लील, मानहाणी संबंधी, धमकी, भीती, यासारख्या किंवा जातीभेद करणाऱ्या कंटेटचा चुकीचा वापर करीत असल्यास त्यांचे अकाउंट बंद केले जाते. कोणत्याही यूजर WhtasApp ची टर्म्स एंड कंडीशन माहिती असायला हवी. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y7zFs1
https://ift.tt/3bzLZEk
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.