Type Here to Get Search Results !

Ulefone Smartphone: गुपचूप लाँच झाला १२ हजारांचा हा शानदार स्मार्टफोन, मिळते पॉवरफुल बॅटरी

नवी दिल्ली : ने अधिकृतपणे जागतिक बाजारात आपला नवीन Note 13P ला सादर केले आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच ला लाँच केले होते. फोनमध्ये ६.५ इंच HD+ डिस्प्ले, MediaTek Helio SoC, २० मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: ची किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या Ulefone Note 13P फोनची किंमत १७० डॉलर (जवळपास १२ हजार रुपये) आहे. हा फोन स्टॅरी ब्लॅक आणि मिस्ट्री ब्लू रंगात येतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फोनची विक्री होईल. Ulefone Note 13P चे स्पेसिफिकेशन्स Ulefone Note 13P मध्ये ६.५ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १८००x२४०० पिक्सल आहे. हे आधीच्या Note 12P च्या एचडी+ स्क्रीनचे अपग्रेड आहे. डिस्प्लेचे बेझल्स पातळ आहे व याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सल Sony IMX३५० प्रायमरी लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसरसह रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला एफ/२.२ लेंससह १६ मेगापिक्सल Sony IMX४८१ सेंसर मिळतो. ड्यूल सिम सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये MediaTek Helio G35 SoC दिला आहे. तसेच, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले असून, स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये पॉवरसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,१८० एमएएचची बॅटरी मिळते. यात साइड माइंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यात एनएफसी सपोर्ट, ३.५ एमएम हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड ११ आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cD8YyP
https://ift.tt/3pbqXCH
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.