Type Here to Get Search Results !

Tecno: दमदार फीचर्ससह आला Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन, ४८MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीने सुसज्ज

नवी दिल्ली : टेक्नोने आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत नवीन हँडसेट ला लाँच केले आहे. कंपनीने या फोनला सध्या बांगलादेशात लाँच केले आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९० बांगलादेशी टका (जवळपास १४,७९९ रुपये) आहे. फोनला इंटरस्टेल ब्लॅक आणि कोमोडो आयलँड रंगात सादर केले आहे. वाचा: Tecno Spark 8 Pro चे फीचर आणि स्पेसिफिकेशन टेक्नोच्या या फोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. यात बाजूला पातळ बेझल्स दिले आहेत. तर खालचे बेझल्स थोडे जाड आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. हा फोन मीडियाटेक हीलियो जी८५ चिपसेटसह येतो व यात Mali- G५२ GPU मिळतो. फोनमध्ये रियरला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे. यात सुपर नाइट मोड २.० सपोर्ट मिळते. रियरला दिलेल्या इतर कॅमेरा सेंसरचा कंपनीने खुलासा केलेला नाही. टेक्नोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. सिक्योरिटीसाठी यात साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर मिळते. फोन सुपर बूस्ट सिस्टम ऑप्टिमाइजेशनने सुसज्ज असून, हा अँड्राइड ११ आउट ऑफ द बॉक्स ओएसवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z9McLY
https://ift.tt/3l03nHI
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.