Type Here to Get Search Results !

Realme Smartphone: रियलमीने लाँच केले GT Master Edition चे दमदार नवीन व्हेरिएंट, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : रियलमीने आपला पॉवरफुल स्मार्टफोन चे नवीन कलर व्हेरिएंट लाँच केले आहे. मिड-रेंज स्मार्टफोन आता Daybreak Blue रंगात उपलब्ध झाला असून, १ डिसेंबरपासून खरेदी करू शकता. GT Master Edition याआधी कॉसमॉस ब्लॅक, वोयागर ग्रे आणि लून व्हाइट रंगात येतो. फोनच्या नवीन व्हेरिएंटची किंमत-फीचर्स जाणून घेऊया. नवीन कलर व्हेरिएंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक १ डिसेंबरपासून फोनला खरेदी करू शकतील. सध्या नवीन व्हेरिएंट नॉटिफाय मी पर्यायासह दिसत आहे. Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल-एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेंसर मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४३०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ७७८G SoC सह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. Realme GT Master Edition ची किंमत या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपये आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. तसेच, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी २९,९९९ रुपये मोजावे लागतील. नवीन कलर व्हेरिएंटची विक्री १ डिसेंबरपासून सुरू होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cUNb66
https://ift.tt/32HoN65
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.