Type Here to Get Search Results !

Oppo A55: १९ हजारांचा शानदार स्मार्टफोन मिळतोय फक्त २,०४० रुपयात, पाहा फीचर्स

नवी दिल्ली : तुम्ही जर कमी बजेटमध्ये येणारा चांगला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट वर स्मार्टफोन आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Oppo A55 चे स्पेसिफिकेशन्स ए५५ स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोन MediaTek Helio G३५ सपोर्टसह येतो. फोनमध्ये फ्रंटलाला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात रियरला ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि दोन प्रत्येक २ मेगापिक्सलचे कॅमेरा मिळतात. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले असून, स्टारोजला २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. पॉवरसाठी यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्राइड ११ आधारित ColorOS ११.१ वर काम करतो. फोनला तुम्ही Rainbow Blue, Starry Black आणि Green रंगात खरेदी करू शकता. डायमेंशनबद्दल सांगायचे तर फोनची लांबी १६३.६० एमएम, रुंदी ७५.७० एमएम जाडी ८.४० एमएम आणि वजन १९३ ग्रॅम आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर, कंपास/मॅग्नेटोमीटर सेंसर, प्रोक्सिमिटी सेंसर, एक्सेलेरोमीटर सेंसर आणि अँबिएंट लाइट सेंसर दिले आहे. किंमत A55 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९० रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर फक्त १५,४९० रुपयात खरेदी करू शकता. फोनवर १३,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त २,०४० रुपयात तुमचा होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DwnkwV
https://ift.tt/3kWIr46
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.