Type Here to Get Search Results !

OnePlus Launch: OnePlus Nord 2 x Pac Man Edition लाँच, अंधारात चमकेल हा सुंदर फोन, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता OnePlus ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. जुलैमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु या नवीन फोनच्या लूकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत, तुम्हाला OnePlus Nord 2 x Pac Man Edition चे बॅक पॅनल ग्लॉसी Pac-Man इन्स्पायर्ड फिनिशसह मिळेल जे अंधारात चमकते. वाचा: युनिक बॅक पॅनल व्यतिरिक्त, स्मार्टफोन एका विशेष पॅकेजिंगमध्ये येतो ज्यामध्ये Pac-Man सिलिकॉन केस आणि Pac-Man फोन धारक समाविष्ट आहे. याशिवाय फोनसोबत मोफत रेड केबल क्लब लॉयल्टी मेंबरशिपही दिली जात आहे. OnePlus Nord 2 x Pac Man Edition ची भारतात किंमत : या OnePlus मोबाईल फोनच्या १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री आजपासून म्हणजेच १६ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता आणि OnePlus च्या अधिकृत साइटवर सुरू झाली आहे. दुसरीकडे, नियमित OnePlus Nord 2 च्या १२ GB RAM / २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, फोनच्या ८ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kDknDu
https://ift.tt/30uQvSx
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.