Type Here to Get Search Results !

JioPhone Next: जिओफोन नेक्स्टचा धमाका, ग्राहकांकडून प्रचंड मागणी, खरेदीआधी जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : आणि यांनी मिळून तयार केलेला JioPhone Next काही दिवसांपूर्वीच लाँच झाला आहे. बाजारात येताच या स्मार्टफोनला जबरदस्त मागणी पाहायला मिळत आहे. रिटेलर्स आणि ग्राहक दोघांकडून फोनला मागणी मिळत असल्याची माहिती रिलायन्स रिटेलने दिली आहे. वाचा: ला ६,४९९ रुपयात लाँच करण्यात आले आहे. रिलायन्स रिटेलनुसार, केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील फोनला चांगली मागणी पाहायला मिळत आहे. तसेच, बाजारात सध्या एकही फोन उपलब्ध नाही जो १,९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये खरेदी करता येईल, असेही कंपनीने म्हटले आहे. JioPhone Next चे फीचर्स JioPhone Next मध्ये ५.४५ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१० प्रोसेसर आणि प्रगती ओएस दिले आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. यात पॉवरसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. JioPhone Next ची किंमत जिओच्या या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. फोनला १,९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. तसेच, बाकी रक्कम ईएमआयद्वारे भरावी लागेल. फोन खरेदीसाठी ग्राहकांना वेगवेगळे ईएमआय प्लान्स मिळतात. तसेच, यासोबत रिचार्ज प्लान्सची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32dohwg
https://ift.tt/30QqcGS
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.