Type Here to Get Search Results !

JioPhone Next खरेदी करण्याचा विचार आहे? त्याआधी जाणून घ्या बुकिंग, ईएमआय आणि डेटा प्लानविषयी संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : बाजारात खरेदीसाठी उपलब्ध झाला असून, फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. तुम्ही १,९९९ रुपये देऊन ईएमआयवर देखील फोन खरेदी करू शकता. ईएमआयसह मंथली प्लान्सचा देखील समावेश आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ईएमआय प्लान्स निवडू शकता. या फोनला कसे ऑर्डर करू शकता, याबाबत जाणून घेऊया. वाचा: रिलायन्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन JioPhone Next चे बुकिंग करू शकता. यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. जिओफोन नेक्स्टला व्हॉट्सअ‍ॅपवरून देखील बुक करू शकता. JioPhone नेक्स्टला व्हॉट्सअ‍ॅपवरून बुक करण्यासाठी ७०१८२७०१८२ या क्रमांकावर Hi लिहून पाठवा. हा जिओमार्ट डिजिटलचा नंबर आहे. रजिस्टर केल्यानंतर फोनवर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्ही स्टोर अथा घराचा पत्ता देऊन फोन खरेदी करू शकता. JioPhone Next ला खरेदी करण्यासाठी काही अटी आहेत. फोन खरेदी करण्यापूर्वी या अटी व नियम जाणून घ्या. १,९९९ रुपये देऊन तुम्ही १८ अथवा २४ महिन्यांच्या ईएमआयचा पर्याय निवडू शकता. ३०० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत मंथली ईएमआयचा पर्याय मिळेल. प्रोसेसिंग फी म्हमून ५०१ रुपये द्यावे लागतील. ३०० रुपयांचा बेसिक प्लान असून, या अंतर्गत एक महिन्यासाठी केवळ ५ जीबी डेटा आणि १०० मिनिटं कॉलिंगची सुविधा मिळेल. XXL प्लानची किंमत ५५० रुपये असून, या अंतर्गत दररोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय इतर प्लान्स देखील आहेत. JioPhone Next च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ५.४५ इंच एचडी प्लस LCD डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वालकॉम २१५ चिपसेटसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. यात एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल रियर आणि फ्रंटला ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ आधारित Pragati OS वर काम करतो. यामध्ये ३.५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. सोबतच, मायक्रो यूएसबी पोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kdAKX8
https://ift.tt/3GVJdrD
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.